LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Sindhutai Sapkal Funeral : सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी

Sindhutai Sapkal Death: समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी १२ वाजता पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. जाणून घ्या त्याबाबतचे लाइव्ह अपडेट्स...

sindhutai sapkal
फोटो सौजन्य:  BCCL
सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी १२ वाजता पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत. जाणून घ्या त्याबाबतचे लाइव्ह अपडेट्स...

Jan 05, 2022  |  06:37 PM (IST)
चक्रधर स्वामींच्या नावाचा जप

अंत्ययात्रेच्या दरम्यान श्री चक्रधर स्वामींच्या नावाचा जप सुरू होता. तसंच, श्रीमद्भगवतगीतेच्या श्लोकांचंही उच्चारण करण्यात आलं. सिंधुताईंना निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

Jan 05, 2022  |  06:35 PM (IST)
अंत्यसंस्कार दफनविधी पद्धतीनं का

सिंधुताईचे अंत्यसंस्कार दफनविधी पद्धतीनं का करण्यात आले याची सध्या चर्चा आहे. याबाबतची माहिती ताईंच्याच संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार, सिंधुताई सपकाळ यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. त्या पंथामध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची प्रथा आहे.

Jan 05, 2022  |  12:47 PM (IST)
महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी

सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

Jan 05, 2022  |  12:46 PM (IST)
सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी

पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होत आहेत. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. 

Jan 05, 2022  |  12:44 PM (IST)
सचिन तेंडुलकरने वाहिली श्रद्धांजली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली वाहिली.
Jan 05, 2022  |  12:39 PM (IST)
सिंधुताईंचे पार्थिव ठोसरपागा स्मशानभूमीत

सिंधुताईंचे पार्थिव ठोसरपागा स्मशानभूमीत; थोड्याच वेळात होणार दफनविधी

Jan 05, 2022  |  12:39 PM (IST)
सिंधुताईंचे पार्थिव ठोसरपागा आणले जाणार

काही वेळातच सिंधुताईंचे पार्थिव ठोसरपागा येथील स्मशानभूमीत आणले जाणार

Jan 05, 2022  |  12:38 PM (IST)
थोड्याच वेळात अत्यंसंस्कार

थोड्याच वेळात सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार

Jan 05, 2022  |  12:34 PM (IST)
अंत्यदर्शन

अंत्यदर्शनासाठी सिंधुताईंचे पार्थिव मांजरी येथील बाल सदन संस्थेत

Jan 05, 2022  |  12:34 PM (IST)
महानुभाव परंपरेनुसार होणार दफनविधी

पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमीत महानुभाव परंपरेनुसार होणार दफनविधी

Jan 05, 2022  |  12:34 PM (IST)
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Jan 05, 2022  |  12:33 PM (IST)
सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी निधन
  • ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन