अजितदादा नाराज होते का, स्वतः त्यांनी केला खुलासा 

पुणे
Updated Nov 11, 2022 | 15:03 IST

राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आज पुणे जिल्ह्यात मावळच्या दौऱ्यावर आहेत.

थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आज पुणे जिल्ह्यात मावळच्या दौऱ्यावर आहेत.
  • अजित पवार कुठे गेले ते काही बोलत का नाही अशा बातम्या वारंवार प्रसार माध्यमात येत होत्या, त्यावर अजित पवार यांनी सडेतोड टीका केली आहे.
  • आपण कुठे होतो याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

मावळ : राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आज पुणे जिल्ह्यात मावळच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार कुठे गेले ते काही बोलत का नाही अशा बातम्या वारंवार प्रसार माध्यमात येत होत्या, त्यावर अजित पवार यांनी सडेतोड टीका केली आहे. (Ajitdada himself revealed whether he was upset or not read in marathi)

अधिक वाचा : PM मोदींचे फिटनेस सीक्रेट

आपण कुठे होतो याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिले.  गेले सहा महिन्यापासून एक कार्यक्रम आखला होता. गेल्या पाच सहा वर्षात परदेशात जाण्याची संधी मिळाली नाही. संधी आल्या पण व्याप होता. त्यामुळे माझा एक कार्यक्रम पूर्वीच ठरला होता. 4 नोव्हेंबरला लेटनाईटला दीड वाजता माझं फ्लाइट होतं. त्यानुसार मी परदेशात गेलो होतो. आज सकाळी परतलो आहे, असे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. 

अधिक वाचा : डिसेंबरमध्ये पिकनिकचं प्लॅनिंग करताय, बेस्ट आहेत हे प्लेस

मी बोलत का नाही या बाबत बातम्या पेरण्यात आल्या की दादा इकडे गेले दादा तिकडे गेले, दादा नाराज आहेत. काय दादांवाजून यांचे अडत कोणाला माहिती. दादाला काही खासगी लाईफ आहे का नाही?  याची विनाकारण आवई उठवण्यात आली आणि बदनामी करण्यात आली. कारण नसताना गैरसमज निर्माण करायचे. हा दौरा सहा महिन्यापूर्वी ठरला होता. त्याची तिकीटं सहा महिन्यापूर्वीच काढली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी