Sharad Pawar statement on Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या लिखाणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उफाळून आला आहे. पवारांच्या या विधानाचा ब्राह्मण महासंघाने निषेध व्यक्त केला आहे. (Anand Dave president of Brahman mahasangh takes dig on sharad pawar over his statement about babasaheb purandare watch video)
पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं, पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांना न्याय द्यावा. आम्ही पवारांची भेट नाकारली हेच बरोबर होत हे आज पुन्हा सिद्ध झालं. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांवर अन्याय केला हे पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचं नसून निंदनीय आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याचा हिंदु महा सभा संघटनेच्या वतीने निषेध करतो.
बाबासाहेब यांचा अभ्यास आणि मांडणी खोटी असेल तर आत्ता माननीय पवार साहेब यांनी आत्ता शिवचरित्र लिहावं, त्यात महाराजांना ब्राह्मण शत्रू, इस्लामचे प्रेमी, आरक्षणाचे समर्थक दाखवावे आणि महाराजांना न्याय द्यावा आणि पवारसाहेबांनी पुरंदरे यांचं कौतुक केलेला व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्या बद्दल स्पष्टीकरण करून स्वतःचीच माफी मागावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणं हे आता थांबवावं अशी विनंती आहे असंही आनंद दवे यांनी म्हटलं आहे.