Balasaheb Thackeray Rare Speech : बाळासाहेब ठाकरे यांचे कधीही न ऐकलेले भाषण

पुणे
Updated Jan 22, 2023 | 17:11 IST

Balasaheb Thackeray Rare Speech Video : वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2003 ला पुण्यात "जिगर 2000" या कार्यक्रमात बाळासाहेबांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला.

थोडं पण कामाचं
  • बाळासाहेब ठाकरे यांचे कधीही न ऐकलेले भाषण
  • पुण्यात "जिगर 2000" या कार्यक्रमात केलेले भाषण
  • ठाकरी शैलीतले बाळासाहेबांचे भाषण ज्याला तरुणाईने दिला जोरदार प्रतिसाद

Balasaheb Thackeray Rare Speech Video : बाळासाहेब ठाकरे म्हणजे अमोघ वक्तृत्वाचे धनी. त्यांचे शब्द कानात साठवून ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील लहानथोर आसुसलेले असायचे. वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2003 ला पुण्यात "जिगर 2000" या कार्यक्रमात बाळासाहेबांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला. पुण्यातील त्यांच्या जन्मापासून ते शिवसेनाप्रमुख या पदापर्यंतचा प्रवास खास ठाकरी शैलीत ऐकविला.

पुण्याच्या गणेश कला क्रीडा येथे राज ठाकरे यांच्या पुढाकाराने "जिगर 2000" या कार्यक्रमचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांच्या संघर्षाची गाथा तरुणाईला सांगितली होती. अखेरच्या पर्वात स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या संघर्षाची गाथा तरुणांना सांगत होते. बाळासाहेबांनी त्यांच्या प्रवासाची हकीकत ठाकरी शैलीत ऐकविली. उपस्थित श्रोते ही गाथा ऐकताना मंत्रमुग्ध झाले होते.

बालपणी बुलबुल तरंग शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न, व्यंगचित्र काढण्याचा छंद, बालपणी केलेली सहा रुपयांची चोरी आणि मनातील अस्वस्थता दूर व्हावी म्हणून परत नेऊन दिलेले पैसे या वेगवेगळ्या घटनाक्रमांतून बाळासाहेबांनी त्यांच्या संघर्षाची गाथा उलगडून सांगितली. मराठी तरुणांचे नकारात्मक विचार आणि त्यांच्यातील इच्छाशक्तीचा अभाव यावर त्यांनी छान कोट्याही केल्या. उपस्थितांनी बाळासाहेबांच्या भाषणाला जोरदार दाद दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी