BJP MLA Laxman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे
Updated Jan 03, 2023 | 16:29 IST

BJP MLA Laxman Jagtap passed away : भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते कॅन्सरवर उपचार करुन घेत होते.

थोडं पण कामाचं
  • भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
  • पुण्यात झाले निधन
  • बाणेरच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे निधन

BJP MLA Laxman Jagtap passed away : भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते कॅन्सरवर उपचार करुन घेत होते. उपचारांसाठी ते बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तिथेच त्यांनी आज (मंगळवार 3 जानेवारी 2023) अखेरचा श्वास घेतला.

लक्ष्मण जगताप त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 4 वेळा नगरसेवक आणि 4 वेळा आमदार झाले. ते 1986 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यांना 2000 मध्ये महापौर होण्याची संधी मिळाली. लक्ष्मण जगताप यांनी 2009 मध्ये चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहून आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजय मिळवला होता. ते 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. भाजपकडून निवडणूक लढवत त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले आणि सलग चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक पण जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे 2017 मध्ये भाजपकडे आली. 

Mukta Tilak: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजाराने निधन

भाजपसाठी दुसरा धक्का

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून पक्ष सावरत असतानाच त्यांना आणखी एक धक्का बसला. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते अंथरुणला खिळून होते आणि राजकारणात सक्रीय नव्हते. त्यांनी आज (मंगळवार 3 जानेवारी 2023) अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांवेळी लक्ष्मण जगताप हे पुण्यातून अँब्युलन्समधून मुंबईत मतदानासाठी गेले होते. जगताप यांना मतदानासाठी व्हिलचेअरवरुन आत नेण्यात आले होते. त्यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे अनेकांनी कौतुक केले होते.

लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द

लक्ष्मणराव जगताप यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. ते 1992 च्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आले.‌ नंतर 1997 च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. ते पहिल्यांदा 1993-94 मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती झाले होते. त्यांनी 1998 मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. ते 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 या कालावधीत पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. मात्र 2003-04 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली.

विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला होता. ते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने शेतकरी कामगार पक्षात दाखल झाले. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून उभे राहिले होते. या निवडणुकीत लक्ष्मण जगताप विजयी होऊन विधानसभेत निवडून गेले होते.

महाराष्ट्र शासनाने दारू विकून केली घसघशीत कमाई, 9 महिन्यात मिळवला 14 हजार 480 कोटींचा महसूल

नोटबंदी वैध, नोटबंदीच्या अधिसूचनेत त्रुटी नाही : SC

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी