VIDEO: हे दृश्य तुम्हांला विचलित करू शकतात, बैलाला क्रूरपणे चिरडणारा अटकेत

पुणे
Updated Nov 20, 2019 | 16:32 IST

बैलाला जेसीबीनं चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सगळीकडे एकच खळबळ उडाली होती आणि मग हा व्हिडिओ कोणता आहे याचा शोध सुरू झाला. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Bull killing
VIDEO: बैलाला क्रूरपणे चिरडणारा अटकेत, तिघांवर गुन्हा दाखल  

थोडं पण कामाचं

  • बैलाला जेसीबीनं चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
  • हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावाचा असल्याची माहिती उघड झाली.
  • जेसीबीनं बैलाला क्रूरपणे चिरडणाऱ्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बैलाला जेसीबीनं चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सगळीकडे एकच खळबळ उडाली होती आणि मग हा व्हिडिओ कोणता आहे याचा शोध सुरू झाला. त्यानंतर हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावाचा असल्याची माहिती उघड झाली. एवढंच काय तर जेसीबीनं बैलाला क्रूरपणे चिरडणाऱ्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सर्जेराव बंडगर असं आरोपी बैल मालकाचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. भाऊसाहेब अण्णा खारतोड, सर्जेराव बंडगर आणि रोहित शिवाजी आटोळे यांना अटक केली असून या तिघांवर गुन्हा दाखला केला असल्याची माहिती बारामती विभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी दिली.  बैलाची क्रूरपणे हत्या करणं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात भारतीय दंडसंहिता तसंच प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रस्त्यावर लोकांचा पाठलाग करणाऱ्या एका बैलाला गोट्या ऊर्फ रोहित शिवाजी आटोळे यानं जेसीबी मशिननं क्रूरपणे बैलाला जखमी करून ठार केलं. त्यानंतर त्याला मंदिराच्या पाठीमागे पुरल्याची घटना २७ ऑक्टोबर २०१९ ला घडली होती. त्यातला एक आरोपी भाऊसाहेब अण्णा खारतोडे यानं त्याच्या मोबाईलमधून बैलाला मारतानाच व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर सगळीकडून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ज्या जेसीबीनं बैलाला मारलं तो जेसीबी जप्त केला आणि पुरलेला बैल उखरण्यासाठी पशु वैद्यकीय विभागाला  पत्रव्यवहार देखील केला आहे. 

शिवसेनेचे विभागप्रमुख अजय भिसे यांनी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत तशी तक्रार देण्यात आली होती. तर आता या प्रकरणी कठोर आणि तातडीनं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...