Shiv Sena: पेंग्विन सेना म्हणतात त्याचा मला अभिमान आहे: आदित्य ठाकरे

पुणे
Updated Oct 01, 2022 | 15:12 IST

Aaditya Thackeray reaction on penguin Sena: 'पेंग्विन सेना म्हणतात त्याचा मला अभिमान आहे', अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: पुणे: 'आम्हाला पेंग्विन सेना (penguin sena) म्हणतात त्याचा मला अभिमान आहे. पेंग्विन आल्यानंतर अनेक लोक प्राणी संग्रहालयात (Zoo) आले त्यामुळे मला अभिमान आहे. आम्ही अनेक कामे केलीत मग त्या नावानेही आम्हाला बोला जसे की कोस्टल रोड सेना...', अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. ते पुण्यात (Pune) बोलत होते. (i am proud to they call me penguin sena aditya thackerays taunt to bjp)

पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले:

'दर्शन घेऊन आज मला बरं वाटत आहे सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. मी देवाकडे काहीच मागत नाही. मी फक्त आशीर्वाद घेतो. वर्षानुवर्ष आम्ही टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला जात असतो. आणि याही वर्षी माझी आई फक्त दर्शनासाठी गेली होती. त्यामुळे मंदिरात राजकारणाबाबत नको बोलायला.'

'मी आता कोथरूडला जाणार आहे. तो चंद्रकांत पाटलांचा मतदारसंघ म्हणून नाही तर मी कुठेही जाऊ शकतो. आम्ही दोघांनी गणपतीच्या पालखीला खांदा देखील लावला होता.'

'आता सध्या शिवसंवाद यात्रा आम्ही करत आहोत. उद्धव साहेब देखील बाहेर पडणार आहेत. अनेक लोक 'मातोश्री'वर येऊन भेटत आहेत. पक्षप्रवेश देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सगळ्या जनतेचा विश्वास उद्धव साहेबांवर आहे.'

'अनेक लोक वेगवेगळे मेळावे करू शकतात. पण परंपरेनुसार आमचा म्हणजेच शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे आणि तो कायम तसाच राहणार. संपूर्ण देशभरातून शिवसेनेचा दसरा मेळावा बघण्यासाठी उत्सुकता आहे.'

'मला पेंग्विन सेना म्हणतात त्याचा मला अभिमान आहे. पेंग्विन आल्यानंतर अनेक लोक प्राणी संग्रहालयात आले त्यामुळे मला अभिमान आहे. आम्ही अनेक कामे केलीत मग त्या नावानेही आम्हाला बोला जसे की कोस्टल रोड सेना...' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाचं नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी