भाजप आमदारावर गुन्हा दाखल, मुलीच्या मांडव टहाळ कार्यक्रमात केला बेफाम डान्स 

पुणे
प्रशांत जाधव
Updated Jun 01, 2021 | 12:28 IST

भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडला आहे. महेशं लांडगे यांच्यासह ५०  जणांवर कोरोना नियमांना पायदळी तुडविल्याचा आरोप ठेवत अखेर गुन्हा दाखल

 Mahesh Landge booked for breaking Covid norms at his daughter's pre-wedding ceremony
भाजप आमदार महेश लांडगेवर गुन्हा दाखल  

थोडं पण कामाचं

  • भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडला आहे.
  • महेश लांडगे यांच्यासह ५०  जणांवर कोरोना नियमांना पायदळी तुडविल्याचा आरोप ठेवत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे  येत्या 6 जून रोजी लग्न आहे.

पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडला आहे. महेश लांडगे यांच्यासह ५०  जणांवर कोरोना नियमांना पायदळी तुडविल्याचा आरोप ठेवत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Mahesh Landge booked for breaking Covid norms at his daughter's pre-wedding ceremony)

महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे  येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे.

महेश लांडगे यांच्या मुलीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात त्यांचा नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पिंपरी-चिंचवडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगे आणि इतर 50 जणांना कोविड नियम तोडल्याबद्दल अटक करण्यात आली. या प्रकरणात त्याचा भाऊ सचिन लांडगे, अजित सास्ते, कुंदन गायकवाड, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्णा धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे आणि प्रज्योत फुगे यांना तसेच 40-50 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षकांनी दिली आहे. भोसरी पोलिस ठाण्याचे शंकर अवताडे. राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड कायद्यानुसार लग्नाला येणार्‍या व्यक्तींची संख्या 50 पर्यंत मर्यादित केली  होती. ( Mahesh Landge booked for breaking Covid norms at his daughter's pre-wedding ceremony)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी