Ajit Pawar : दसरा मेळावे झाले आता सर्वसामान्य जनतेसाठी निर्णय घ्या  - अजित पवार

पुणे
Updated Oct 06, 2022 | 14:29 IST

Ajit Pawar : शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर चालत होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच वेदांत प्रकल्पाबाबत भाजप खोटं बोलत असल्याचे स्पष्टीकरणही पवार यांनी दिले.

थोडं पण कामाचं
  • शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर चालत होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले आहे.
  • तसेच वेदांत प्रकल्पाबाबत भाजप खोटं बोलत असल्याचे स्पष्टीकरणही पवार यांनी दिले.

Ajit Pawar : पुणे : शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर चालत होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच वेदांत प्रकल्पाबाबत भाजप खोटं बोलत असल्याचे स्पष्टीकरणही पवार यांनी दिले. (ncp leader ajit pawar criticized bjp and cm eknath shinde over vedanta foxconn project moved to gujarat )

अधिक वाचा :

आज बारामतीत अजित पवार म्हणाले की, शिवसेनेच्या दोन्ही गटांनी त्यांचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्यामुळे त्यांना ऐकण्याचा सगळ्यांना कुतुहल होते. दोन्हीकडे गर्दी होती हे मी पण पाहिले आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना देखील मी टीव्ही वर पाहिल्या. आम्ही दोन अडीच वर्षे सरकार मध्ये काम केलं, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे विचार होते व आता जूनमध्ये राजकीय बदल करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत हे त्यांचेही  विचार होते असे पवार म्हणाले. तसेच आता शिवसैनिकांनी विचार करून जो तो निर्णय घ्यावा  ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर चालतो यात काही तथ्य नाही. 

अधिक वाचा : Eknath Shinde : आनंद दिघेच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी केली होती धक्कादायक चौकशी... सांगताना शिंदे संतापले


मंत्रिमंडळात काम करीत असताना ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे याच्यात मी कधी ऐकले नाही की झेंडा शिवसेनेचा आहे अजेंडा राष्ट्रवादीचा आहे , कारण तिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस होती आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 2004  व 2009 ला देखील आघाडी होती. त्यामुळे असे काही नसते. यामध्ये आम्ही कर्जमाफीचा  घेतला तो सगळ्यांचाच होता, कोरोनाचा मुकाबला करताना बाबतीतही सर्वांनी मिळून निर्णय घेतला. इतरही निर्णय मिळूनच घेतले आहेत. काल जे काही वक्तव्य त्यांनी केले ते राजकीय हेतूने होते असे असेही पवार म्हणाले.

अधिक वाचा : Shiv Sena Dussehra Rally: शिवतीर्थावरुन उद्धव ठाकरेंची गर्जना, दसरा मेळाव्यातील भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

वेदांत प्रकल्प  गेल्याने दोन लाख तरुणांच्या  नोकऱ्या गेल्याचा रोष झाकण्यासाठी  टक्केवारी मागितली म्हणून गेला असा आरोप  केला आहे यावर अजित पवार म्हणाले, की हा आरोप धांदांत  खोटा आहे . याबद्दल मी मागेही मीडियाच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत कोणते निर्णय घ्यायचे ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीचे सर्व टिपणे आपल्याकडे आहेत. जुलैमध्ये मुख्यमंत्री हाय पावर कमिटीची बैठक घेतात.  तुम्हीच मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प येता म्हणून सांगता आणि परत तथ्य नसलेले आरोप करता हे योग्य नाही असे अजित पवार म्हणाले. 

अधिक वाचा : Shiv Sena Dussehra Rally: "कटप्पा, रावण, खोकासूर अन् दाढी..." दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून शिंदेंवर टीकेचे बाण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी