Sharad Pawar । दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेला शरद पवारांनी सुनावले, म्हणाले...

पुणे
Updated Oct 03, 2022 | 19:10 IST

sharad pawar on shivsena शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे व ठाकरे गटातील संघर्ष टोकाला गेल्याने आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोघांना सुनावले.

थोडं पण कामाचं
  • अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा गौप्यस्फोट
  • ठाकरे आणि शिंदे गटाला सुनावले
  • शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत देखील विधान केले आहे

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, भाजपकडून आरोप करण्यात येत आहे की, ठाकरे गटाकडून होणाऱ्या शिवाजी पार्कवरील शिवसेना मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत केली जात आहे. शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले. “या सगळ्या गोष्टींमध्ये राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि दुसरा कार्यक्रम शिंदेंच्या सेनेचा आहे. त्यामध्ये अन्य पक्षाने येण्याचं काही कारण नाही.” (NCP's support for Thackeray's Dussehra gathering?, Sharad Pawar finally said)

अधिक वाचा : Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार? नीलम गोऱ्हेनी केलं स्पष्ट, म्हणाल्या.....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.याचबरोबर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे व ठाकरे गटाती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवारांनी “दुर्दैवाने एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्यामधून एक स्पर्धा सुरू झाली. संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते काही राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्याचे जे जबाबदार लोक आहेत, त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे आणि मग ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही आम्हा लोकांसारखे वरिष्ठ लोकांवर असेल. त्याहीपेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या १४ कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही उद्या ते मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल.” असं मत पवार यांनी मांडलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी