Ajit Pawar on Vaccination : लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना

पुणे
Updated Jan 04, 2022 | 20:28 IST

Ajit Pawar Vaccination २०२१ पासून देशात लसीकरणास सुरूवात झाली, अनेक नागरिकांना आवाहन, विनंती करूनही त्यांनी लस घेतली नाही. आता पुणे आणि मुंबई शहरात सक्तीने नो व्हॅक्सिन नो एंट्रीचे पालन करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोनाचे संकट बळावले आहे.
  • मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
  • आता संपूर्ण पुण्यात नियमांची कडक अंमलबजावणी होणार

Ajit Pawar Vaccination : पुणे :  २०२१ पासून देशात लसीकरणास सुरूवात झाली, अनेक नागरिकांना आवाहन, विनंती करूनही त्यांनी लस घेतली नाही. आता पुणे आणि मुंबई शहरात सक्तीने नो व्हॅक्सिन नो एंट्रीचे पालन करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. फक्त सार्वजनिक ठिकाणीच नाही तर सरकारी कार्यालयातही सरकारी कर्मचार्‍यांनी लस घेतली नसेल तर त्यांना प्रवेश देता येणार नाही पवार म्हणाले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोनाचे संकट बळावले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता संपूर्ण पुण्यात नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. कोरोनापसून सुरक्षेसाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे. जे नागरिक मास्क लावणार नाही त्यांना ५०० रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच थुंकल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल असेही पवार म्हणाले. कोरोनपासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन ९५ प्रकारचा मास्क वपारावा असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

देशात कोरोनासह ओमिक्रॉनचे संकट वाढत असून त्याबाबत खबरदारी घेणे आवश्य आहे, जगातील १०५ देश हा ओमिक्रॉनचे संकट वाढले आहे. देशातील १३ राज्यात आणि महाराष्ट्रात ११ ठिकाणी ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून पुण्यात कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर १८ टक्के असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत शाळेचे पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग बंद राहतील असे असले तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. तसेच १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू होणार आहे, त्यामुळे दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी