Pune : राज्यपालांना राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे, महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की?

पुणे
Updated Dec 02, 2022 | 18:10 IST

Bhagat Singh Koshyari in pune गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी पुणे दौऱ्यावर असल्याने राजभवन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

थोडं पण कामाचं
  • पुण्यात राज्यपालांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
  • भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध
  • पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमान करणारे विधान केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल पुणे दौऱ्यावर असतांना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांनी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune: NCP Shows Black Flags to Governor, Women Officers Pushed by Police)

अधिक वाचा : मुंबईकरांनो ऐकलं का! 15 दिवसांसाठी शहरात लागू होणार संचारबंदी, पण का? जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांच्या  विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस पाठवली होती. तसेच जगताप यांना वानवडी पोलीस ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता प्रशांत जगताप हे घरी नसून आंदोलनासाठी जगताप अज्ञात स्थळी गेले होते. पण आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विद्यापीठ चौकात काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले आहे. तर काही महिला पदाधिकाऱ्यांकडून राज्यपालांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांचा निषेध म्हणून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.

अधिक वाचा : विदर्भातून सारस पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर, नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

आज राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, छत्रपतींवर बोलण्याचा राज्यपालांना कोणताही अधिकारी नाही. राज्यपालांनी आमच्यासमोर याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागावी. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी