...हे पंतप्रधानांला शोभत नाही, मोदींबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

पुणे
Updated Jan 08, 2023 | 17:02 IST

Raj Thackeray on PM Narendra Modi : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी कोणत्याही एका राज्याकडे विशेष लक्ष देऊ नये, असे राज ठाकरे म्हणाले

थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंनी पीएम मोदींवर टीका
  • १८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात मुलाखत कार्यक्रम
  • गुजरातला प्राधान्य देणे पंतप्रधानांना शोभत नाही.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासाठी देशातील प्रत्येक राज्य समान असले पाहिजे. तुम्ही स्वतः गुजराती आहात, त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणे पंतप्रधानांना शोभत नाही. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. (Raj Thackeray criticized PM Modi)

अधिक वाचा : Pune : श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला लाखो भाविकांची गर्दी; बैलगाडा घाटातला थरार ठरतोय आकर्षण

१८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या मुलाखत कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की 2014 मधील माझी भाषणे पहा, त्यावेळी मी पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे विशेष लक्ष द्यावे असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एका राज्याकडे विशेष लक्ष देऊ नये. २०१४ साली माझी तीच भूमिका होती, आजही तीच भूमिका आहे.

अधिक वाचा : ​IND vs SL : सूर्या म्हणजे विक्रम; सूर्यकुमारने तीनवेळा बनवले सर्वात वेगवान शतक

2014 सालानंतर ज्या गोष्टींवर मी आवाज उठवला त्यानंतर काय झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मला काही गोष्टी आवडल्या नाहीत ज्यामुळे मी 2019 मध्ये 'लाव रे टू व्हिडिओ' मोहीम सुरू केली. राजकारणात आता बदलाची गरज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी