Ramdas Athawale | "शिंदे आणि फडणवीसांची जमलीय जोडी..." पाहा शिंदे सरकारवर रामदास आठवलेंची खास कविता

पुणे
Updated Jul 11, 2022 | 15:49 IST

Ramdas Athawale poem: राज्यात सत्तांतर झाल्यावर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक खास कविता केली आहे. 

सांगली : राज्यात सत्तांतर झाल्यानतंर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या सरकारवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक खास कविता म्हटली आहे. सांगलीत एका कार्यक्रमात भाषण करताना रामदास आठवले यांनी ही कविता बोलून दाखवली. (Ramdas Athawale poem for Eknath Shinde and Devendra Fadnavis Government)

यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, अस आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्यसरकार चालणार नाही अस म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्ष नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते. या संमेलनाचं उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जोपर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. अस सांगून आठवले पुढे म्हणाले, 'शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी' अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहिती ही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी