Birthday party of Sonya-बर्थ डे आहे सोन्याचा, जल्लोष साऱ्या गावाचा! ...
सातारा- सातारा तालुक्यातील पाटखळ गावातील शिंदे कुटुंबाने आपल्या लाडक्या 'सोन्या' नामक बैलाचा वाढदिवस एकदम थाटामाटात साजरा केला.
कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस साजरा करतात तशा प्रकारे बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यात दिवसभर सोन्या बैलाच्या वाढदिवसाचीच चर्चा होती.
अधिक वाचा : Egg : अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका
सोन्या बैल नसून तो जिवाभावाचा मित्रच आहे, असे शिंदे कुटुंबातील सदस्यांंचे म्हणणे आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने शेतकऱ्याने सोन्या बैलाचे औक्षण करून केक कापला, त्याला खाऊ घातला आणि त्याच्यासह ‘हॅपी बर्थ डे सोन्या’अश्या शुभेच्छा देत फोटो काढला. यानंतर सोन्या बैलासोबत फोटो काढून घेण्यासाठी गावातील तरुणांनी गर्दी केली होती. सोन्याच्या वाढदिवसानिमित्त शिंदे कुटुंबाने फटाके फोडले आणि गोडाधोडाची मेजवानी दिली. तसेच सोन्या बैलाला गोडधोड खाऊ घातले.