Supriya Sule : ईडी सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू- सुप्रिया सुळे 

पुणे
Updated Jan 05, 2023 | 15:13 IST

Supriya Sule on Mahavitaran Strike : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार तेच तेच सांगून ते बोर करतात. त्यात तरी नवीन सांगा आणि तुम्ही सत्तेत आहात आम्हालाच अडचणीत आणण्यासाठी आणि आम्हालाच त्रास देण्यासाठी आला आहात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

थोडं पण कामाचं
  • सुप्रिया सुळे यांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल
  • पुण्यात महावितरणाच्या प्रश्नावर केला सरकारचा निषेध
  • पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला सवाल

supriya sule lashes out at Shinde fadanvis Govt., पुणे :  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार तेच तेच सांगून ते बोर करतात. त्यात तरी नवीन सांगा आणि तुम्ही सत्तेत आहात आम्हालाच अडचणीत आणण्यासाठी आणि आम्हालाच त्रास देण्यासाठी आला आहात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. (supriya sule lashes out at Shinde fadanvis Govt. read in marathi )

 तुम्ही सत्तेमध्ये सर्वसामान्य माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी आले आहात, हे ईडी सरकारने  लक्षात घ्यावे. हे सरकार आल्यापासून काय चालय? तर विरोधकांच्या विरोधात काय तरी बोलायचं.  सूड बुध्दीने कारवाई करायची  त्यामुळे सुडाच्या राजकारणाची सुरूवात ही ईडी सरकारने महाराष्ट्रात पहिल्यांदा केली आहे आणि आज मला विचाराल तर सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांनी विजेचा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, हे  मोठं आव्हान आहे. कुणाची बिल्डिंग तोड, कुणावर रेड कर यांच्यासाठी सरकार नसते. सरकार हे माय बाप जनतेच्या सेवेसाठी असते, असेही त्यांनी वेळी सांगितले.  

अधिक वाचा :  दीपिका सारखी सुंदर आणि तेजस्वी त्वचा हवीय? मग हे वाचाच

मला आजही माननीय प्रधानमंत्र्याचे शब्द आठवतात " की मी या देशाचा प्रधानसेवक आहे" कदाचित हे लोक मोदींचे शब्द विसरतील, पण मी नाही विसरत. कारण का ते शेवटी देशाचे प्रधानमंत्री आहेत. तर देशाचे प्रधानमंत्री जे भारतीय जनता पक्षाचेच कॅंन्डिडेट होते ते सातत्याने म्हणतात की आम्ही प्रधान सेवक आहोत तर सेवा सोडून फक्त सुडाचा राजकारण करून सेवेचा कुठलेही काम गेल्या तीन साडेतीन महिन्यात या ईडी सरकारला करता आलेले नाही. अशीही टीका यावेळी त्यांनी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी