Exclusive : एकनाथ शिंदेनी फडणवीसांचे ऐकून गलिच्छ राजकारण करू नये - सुषमा अंधारे 

पुणे
Updated Nov 14, 2022 | 21:13 IST

 राज्यातील राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे आणि हे सर्व सुरू आहे त्याला फूस ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्यातील राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे
  • . सध्या त्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेसाठी कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत
  • सुषमा अंधारे यांच्याशी Exclusive बातचित केली आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाराली जोशीराव यांनी.

स्वाराली जोशीराव ,  पुणे :    राज्यातील राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे आणि हे सर्व सुरू आहे त्याला फूस ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सध्या त्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेसाठी कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. (Sushma Andhare Exclusive interview for Times now marathi)

सुषमा अंधारे यांच्याशी Exclusive बातचित केली आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाराली जोशीराव यांनी. टाइम्स नाऊ मराठीशी बोलताना सुषमा अंधारे यांनी सध्याच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले.  सध्या ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे मुख्य प्रवाहातील प्रश्न ऐरणीवर येत असून घाणरेडे राजकारण सुरू आहे.  माझ्यावर वैयक्तिक हल्ला करण्यात आला, पण मला महाराष्ट्राचे आभार मानायचे आहे की त्यांनी मला समजून घेतले.  तसेच राष्ट्रवादीचे  आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झाले त्यांच्यावरही वैयक्तिक हल्ला करण्यात आला. 

कळवा ब्रीजवरून श्रेयवादाची लढाई रंगली त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांना त्याचा इतका राग आला की त्यांनी थेट वैयक्तिक हल्ला केला.  त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.  ज्या लोकांवर  ईडी आणि सीडी लावता येत नाही त्यांच्यावर वैयक्तीक हल्ले केले जात आहे. हा गलिच्छ प्रकार सुरू आहे. 

शिवसेनेकडून हा गलिच्छ प्रकार भाजप करून घेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांचे ऐकू नका अशी विनंती यावेळी सुषमा अंधारे यांनी केली.  अब्दुल सत्तार यांच्याकडून जे बोलवून घेतले जात आहे. त्यात शिंदे आणि त्यांच्या साथीदारांना डॅमेज करण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे मला वाटत नाही, असे मत अंधारे यांनी व्यक्त केले.  

मला माहिती आहे, गुलाबराव पाटील असो वा इतर कोणी, हे बाळासाहेबांचा शिवसैनिक  आहेत ते कधीही महिलांचा अपमान करू शकत नाही, मग हे त्यांच्याकडून कोण करवून घेत आहेत याचा शोध घेतला पाहिजे.  बच्चू कडू यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांची बदनामी सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांशी असंगाशी संग करू नये, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. 

हर हर महादेव या चित्रपटात चुकीचा संदर्भ दाखविण्यात आला. इतिहास तोडून मोडून दाखविण्यात आला. गावातील पाटील बायकांचा बाजार भरवायचे असे दाखविण्यात आले होते. आणि या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हॉइस ओव्हर दिला आहे. त्यामुळे त्यांनी तरी अशा प्रकारच्या चित्रपटाची संहिता वाचली पाहिजे होती, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,  राऊत साहेबांनी शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यांनी जो संघर्ष केला त्याने शिवसेनाचा फायदाच झाला आहे.  आगामी काळात ते महाप्रबोधन यात्रेत दिसतील, अशी ब्रेकिंग न्यूजही त्यांनी यावेळी दिली.  

संजय राऊत हे मोठे नेते आहेत, मी एक छोटीशी कार्यकर्ता आहे. त्यांच्याकडून आगामी काळात संजय राऊत यांच्याकडून भाषण कौशल्य शिकून घेणार असल्याचेही अंधारे म्हणाल्या. 


भारत जोडो यात्रेचा देशभरात चांगला परिणाम होईल. महाप्रबोधन यात्रा आणि भारत जोडो यात्रा यांचा उद्देश एक आहे. देशातील हेट पॉलिटिक्स दूर करणे आणि लोकांना जागृत करणे हा उद्देश असल्याने आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनीही भारत जोडो यात्रेत सामील व्हायला हवे, असा मिश्किल टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.  दोन राज्यांच्या निवडणुकीत भारत जोडो यात्रेचा परिणाम होईल, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी