पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. यामुळे उद्विग्न होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी कविता सादर केली आहे. (Today again an incident happened..., Amol Kolhen's poem with excitement)
अधिक वाचा : Chitra Wagh: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकवरून चित्रा वाघ संतापल्या
सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे म्हणाले, “खरं तर, हा व्हिडीओ खूप आनंदाने किंवा उत्साहाने करत नाही, पण गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात सातत्याने जे घडत आहे, त्यावर व्यक्त व्हावंसं वाटलं, म्हणून हा व्हिडीओ केला आहे. काल याच विषयावर देशाच्या सर्वोच्च सभागृहातही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण आज पुन्हा एक घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्यक्त व्हावंसं वाटलं. त्यासाठी एक कविता केलीये, ती कविता तुमच्यासाठी सादर करतो…”