Udayanraje Bhosale on Shiv Sena: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची आज खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. पुण्यात झालेल्या या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजेंना सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि शिवसेनेवरुन ठाकरे विरुद्ध शिंदे जो संघर्ष सुरू आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर उदयनराजे भोसले यांनी एक मोठं विधान केलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी शिवसेना कुणाची यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "शिवसेना कोणाची म्हणजे? शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झाली आहे. मग मी माझीच आहे असं म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र पण माझाच म्हटला पाहिजे. पण महाराष्ट्र लोकांचा आहे."