राणेंच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात घडली धक्कादायक घटना ! दशावतार सुरु असतानाचं कलाकाराला आला हृदयविकाराचा तीव्र झटका,पहा व्हिडीओ

actor gets heart attack on stage in sindudurga : कलाकाराला तीव्र झटका आल्यानंतर तो स्टेजवरच खाली कोसळला. सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल देखील झाला आहे. दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकाराला तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

 actor gets heart attack on stage in sindudurga
दशावतार सुरु असतानाचं कलाकाराला आला हृदयविकाराचा तीव्र झटका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दशावतार नाट्य प्रयोग सुरू असतानाच कलाकाराला हृदयविकाराचा तीव्र झटका
  • तीव्र झटका आल्यानंतर कलाकार स्टेजवरच खाली कोसळला.
  • नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित सुरु होता प्रयोग

सिंधुदुर्ग: भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग येथे आयोजित दशावतार महोत्सवात एक धक्कादायक घटना घडली आहे. दशावतार नाट्य प्रयोग सुरू असतानाच कलाकाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कलाकाराला तीव्र झटका आल्यानंतर तो स्टेजवरच खाली कोसळला. सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल देखील झाला आहे. दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकाराला तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा : IPL 2022त्रिपाठीचा हैराणजनक कॅच, मात्र काही तासांत बसला झटका

अधिक वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करा

राणेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेछ्या

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाचा ट्वीट करत शुभेछ्या दिल्या आहेत. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी एमएसएमई सारख्या अतिमहत्वाच्या विभागाच्या बळकटीसाठी ते लढत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

अधिक वाचा :​ सोमवार १२ एप्रिल २०२२ चे राशीभविष्य, वाचा कसा जाईल आजचा दिवस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी