कोकणासाठी मोठी बातमी: बारसू, सोलगावला रिफायनरी येणार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा हिरवा कंदील

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह दिल्ली दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याचंच फलित समोर आलं आहे. राज्यात रिफायनरी (Refinery) कंपनी येणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. राज्याचे नवे उद्योगमंत्री (Industries Minister) उदय सामंत (Uday Samant) आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री( Central petroleum minister) हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri ) यांच्यात रिफायनरी प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा झाली आहे.

Big news for Konkan: Refineries coming up at Barsu, Solgaon
कोकणासाठी मोठी बातमी: बारसू, सोलगावला रिफायनरी येणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही 20 मिलियन मेट्रिक टन इतक्या क्षमतेची आहे.
  • उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यात रिफायनरी प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा.

Konkan refinery : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह दिल्ली दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याचंच फलित समोर आलं आहे. राज्यात रिफायनरी (Refinery) कंपनी येणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. राज्याचे नवे उद्योगमंत्री (Industries Minister) उदय सामंत (Uday Samant) आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री( Central petroleum minister) हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri ) यांच्यात रिफायनरी प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा झाली आहे. कोकणातील रिफायनरी तसेच बारसू सोलगावबाबत सकारात्मक चर्चा उदय सामंत आणि पुरी यांच्यामध्ये झाली आहे. (Big news for Konkan: Refineries coming up at Barsu, Solgaon; Green signal from Union Petroleum Minister)

कोकणातल्या नाणार (Nanar Refinery) येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगावात रिफायनरी येण्याची दाट शक्यता आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावला हरदीप सिंह पुरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. नाणार या ठिकाणची रिफायनरी रद्द झालेली असली तरी या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा आणि पूर्वी प्रस्तावित असलेल्या रिफायनरीची क्षमता ही 60 मिलियन मेट्रिक टन इतकी होती. पण त्याच वेळेला बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही 20 मिलियन मेट्रिक टन इतक्या क्षमतेची आहे.

Read Also : मुंबईत रिक्षा-टॅक्सीला बोलताना करावा लागेल विचार, का बरं?

त्यामुळे रिफायनरीची क्षमता कमी करून कोकणाच्या आर्थिक विकासामध्ये बाधा नको. नाणारमध्ये मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होत असल्यास त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेची अर्थात 60 मिलियन मॅट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभी करावी असा देखील एक सूर अद्यापही नाणार या ठिकाणाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचा आहे. दरम्यान एका ठिकाणी मोठ्या क्षमतेची रिफायनरी उभारता येणं शक्य नसेल तर त्याचे विभाजन करून दोन ते तीन टप्प्यांमध्ये ही रिफायनरी उभारावी अशी चर्चा देखील सुरू होती. 

Read Also : दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा पलटवार

राजन साळवींचा पाठिंबा 

उदय सामंत उद्योगमंत्री झाल्यानंतर कोकणातल्या रिफायनरीबाबतच्या घडामोडी सध्या वेगाने घडताना दिसून येत आहेत. या प्रकल्पाविषयी स्थानिक पातळीवरील विरोध, समर्थन, जमीन मालकांची परवानगी याचा सारासार विचार केला जाईल. याशिवाय सामंत आणि केंद्रिय मंत्री यांच्या  बैठकीच्या आणखीन काही फेऱ्या होतील, अशी माहिती देखील आता समोर येत आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी हे रिफायनरी समर्थनार्थ आहेत. माझा रिफायनरीला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिलेली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी