Narayan Rane Arrest: नारायण राणेंना अटक, आक्षेपार्ह विधान प्रकरणी कारवाई

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथील गोळवली गावातून ताब्यात घेतलं आहे.

Big News Now! Narayan Rane arrested, action taken in objectionable statement case
Narayan Rane Arrest: आत्ताची मोठी बातमी! नारायण राणेंना अटक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथील गोळवली गावातून ताब्यात घेतलं आहे.
  • त्यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
  • त्यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

Narayan Rane Arrest: संगमेश्वर :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथील गोळवली गावातून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. . त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र पोलिसांकडे कोणतही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. अखेर पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतलं असून रत्नागिरी कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीने सुनावणी देण्यास नकार दिला आहे.

नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जनआशीर्वाद यात्रा आता आंदोलन होणार 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर राणे समर्थकांना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रमोद जठार म्हणाले, की जो पर्यंत नारायण राणे यांची सुटका होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. गुरूवारी मुंबई गोवा हायवे बंद करणार आहोत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी