Kirit Somaiya : किरीट सोमय्या रत्नागिरी दौर्‍यावर, अनिल परबांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी

Kirit Somaiya : रत्नागिरीतील दापोली तालुक्यात मुरुड समुद्र किनारी साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे आहे असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. आज किरीट सोमय्या रत्नागिरीच्या दौर्‍यावर आहेत.

थोडं पण कामाचं
  • रत्नागिरीतील दापोली तालुक्यात मुरुड समुद्र किनारी साई रिसॉर्ट आहे.
  • हे रिसॉर्ट शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे आहे असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
  • तसेच हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya :  रत्नागिरी : रत्नागिरीतील दापोली तालुक्यात मुरुड समुद्र किनारी साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचे आहे असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. आज किरीट सोमय्या रत्नागिरीच्या दौर्‍यावर आहेत. सोमय्या रत्नागिरीच्या दौर्‍यावर असल्याने जिल्ह्यातील हालचलींना वेग आल आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते अनिल परब यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (bjp leader kirit somaiya in ratnagiri anil parab resort police fir)

अधिक वाचा : Raigad Pen : भोगावती नदीपात्रात आढळलेली वस्तू डमी बॉम्ब; 4 तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

किरीट सोमय्या तेजस एक्सप्रेसने रवाना

किरीट सोमय्या आज तेजस एक्सप्रेसने रत्नागिरीला रवाना झाले आहेत. दापोली कोर्टाने रिसॉर्टसंबंधी अनिल परब यांना समन्स बजावून १४ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. आज रत्नागिरी पोलीस अनिल परब यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्हाबद्दल किरीट सोमय्या यांची जबाब नोंदवणार आहे.

अधिक वाचा :  Washim ! तो ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर चाकूने वार करत होता, लोक फक्त बघत होते ...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी