रत्नागिरी : रत्नागिरी काही दिवसांपूर्वी आंबा घाटात सापडलेला मृतदेह खून करुन फेकल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा घाटातील गायमुख मंदीरा जवळ खोल दरीमध्ये सुमारे ७० ते ८० फुटावर एका पुरूषाचा कुजलेला मृतदेह आढळला होता. तो कुजलेला असल्याने त्याची ओळख पटविणे ते आव्हानात्मक काम होते.
प्राथमिक चौकशीनंतर असे निष्पन्न झाले की, या व्यक्तीचा खून करुन त्याचे प्रेत दरीमध्ये फेकून दिले होते. या घटनेचा दि . ०९ / ०५ / २०२२ रोजी देवरुख पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारच्या गुन्हयांमध्ये मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेणे हे खूप आव्हानात्मक काम असल्याने पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांनी गुन्हे शाखेचे पथक नेमून सदर गुन्हा तात्काळ उघडकिस आला पाहीजे अशा सुचना देऊन मार्गदर्शन केले.
गुन्हे शाखेच्या पथकाने आंबा घाटात घटनास्थळी जाऊन भेट देऊन, परिस्थितीची माहीती घेऊन तपास सुरु केला.तपास सुरु असताना सपोफौ . प्रशांत बोरकर यांना अशी माहीती मिळाली की, मृत देहाची जुळणारे वर्णन असलेला एक पुरुष कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजीचे उपनगर असलेल्या तारदाळ या गावातून हरविला आहे आणि त्याबाबत शहापूर पोलीस ठाणे येथे तो हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे.
सदर बाबत शहापुर पोलीस ठाणे येथे नापत्ता रजि . नं . २७ / २०२२ नोंद असल्याचे समजले आणि त्यातील हरविलेल्या इसमाचे नाव महादेव किसन निगडे असल्याचे समजले. या अनुषंगाने अधिक माहीती घेता आणि माहीतगार लोकांकडुन खात्री केली असता आंबा घाटातील मृतदेह हा महादेव किसन निगडे , वय ३० वर्षे , रा . शिवाजी चौक , गणेश मंदीर जवळ , तारदाळ , ता . हातकणंगले याचा असल्याचे निष्पन्न झाले.
ही माहीती मिळाले नंतर पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने, देवरुख पोलीस ठाण्याच्या एका पथकासह तारदाळ येथे भेट देऊन तपास केला असता आरोपी ( १ ) सुरज मेहबुब चिकोडे , वय २४ वर्षे , रा . मराठी शाळे जवळ , तारदाळ याचा यातील मयत इसम महादेव किसन निगडे याचेशी गाळयाच्या आर्थिक व्यवहारावरुन वाद झाल्यांने आरोपी ( २ ) गणेश ऊर्फ राजेश शिवारे वय २८ वर्षे , आणि एका विधीसंघर्षीत बालकाचे मदतीने महादेव निगडे याचा खून करुन दि . १६/०४/२०२२ पहाटे / मध्यरात्री आंबा घाटात टाकल्याचे समजले.
या गुन्हयांतील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असुन आज दि .१० / ०५ / २०२२ रोजी त्यांना मा . न्यायालयात हजर केले असता , दि. १६ / ०५ / २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोनि . बाळकृष्ण जाधव देवरुख पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर गुन्हा कौशल्यपूर्ण उघडकिस आणण्यामध्ये सहभागी असलेले स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा , सपोफौ प्रशांत बोरकर , पोहवा विजय आंबेकर , अरुण चाळके , बाळु पालकर , पोना . योगेश नागवेकर , दत्ता कांबळे , तसेच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव , पोहवा . भुजबळराव , पोहवा . संतोष सडकर यांचे पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग यांनी अभिनंदन केले आहे .