दीपक केसरकरांना 'या' गोष्टीमुळे एकनाथ शिंदे वाटतात मोठ्या मनाचे मुख्यमंत्री, किस्सा सांगताना केसरकर भावुक

एकनाथ शिंदेंनी 50 आमदारांच्या मदतीने शिवसेनेसह महाविकास आघाडीला तडा दिला. सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजप सोबत युती करत शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. सरकार स्थापल्यानंतर प्रत्येक आमदार आप-आपल्या मतदारसंघात परतला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरही आपल्या मतदारसंघात आले. यावेळी माध्यमांशी मुख्यमंत्र्याविषयी बोलताना केसरकर भावुक झाले होते.   

Kesarkar thinks Shinde is a big hearted CM because of this
केसरकरांना 'या' गोष्टीमुळे शिंदे वाटतात मोठ्या मनाचे सीएम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकरांचे भव्य स्वागत
  • केसरकर शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना.

सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदेंनी 50 आमदारांच्या मदतीने शिवसेनेसह महाविकास आघाडीला तडा दिला. सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजप सोबत युती करत शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. सरकार स्थापल्यानंतर प्रत्येक आमदार आप-आपल्या मतदारसंघात परतला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरही आपल्या मतदारसंघात आले. यावेळी माध्यमांशी मुख्यमंत्र्याविषयी बोलताना केसरकर भावुक झाले होते.   

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करणारे शिवसेनेचे आमदार आपआपल्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. सिंधुदुर्गमधील आमदार आणि बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हेदेखील मंगळवारी सावंतवाडी मतदारसंघात दाखल झाले. समर्थकांनी 'दीपक केसरकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करत केसरकर यांचं भव्य स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा संवाद सांगताना दीपक केसरकर काहीसे भावुक झाले.

Read Also : अशोक स्तंभावरील आक्रमक सिंह पाहून राजकीय नेते झाले आक्रमक

'मी माझ्या मतदारसंघात जाणार असल्याचं जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तेव्हा लगेच आवश्यकता असेल तर मीही तुमच्यासोबत येतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्वत:ही माझ्यासोबत येण्याची तयारी दर्शवली. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. ज्याने आपल्या गटाचं प्रतिनिधित्व केलं, आपली ज्याने बाजू मांडली त्याच्याबरोबर मी सुद्धा त्याच्या मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे, अशी जर भावना कुठला मुख्यमंत्री ठेवत असतील तर ते महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो,' असं केसरकर म्हणाले. यावेळी बोलताना केसरकर यांना हुंदका आवरता आला नसल्याचंही पाहायला मिळालं.

Read Also : सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस HPV भारतात होणार तयार

उद्धव ठाकरेंचं या गोष्टीसाठी केलं कौतुक

गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात दाखल झालेल्या दीपक केसरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी साईंच्या पालखीची पूजा केली आणि सावंतवाडी येथून शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत दीपक केसरकर हे शिंदे गटाची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेनंही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं सांगत दीपक केसरकर यांनी त्यांचं कौतुक केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी