Ratnagiri Crime News: रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत गाडी चालवत तब्बल आठ गाड्यांना धडक दिली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, रत्नागिरीत शहराजवळील कुंवारबाव येथे थरार प्रसंग घडला आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या असलेल्या एका पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
ही घटना घडल्यानंतर या प्रकरणाची तक्रार कोणी केलेली नव्हती मात्र जिल्हा पोलिसांकडून दखल घेत या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत अशी वॉर्निंग जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी अलीकडे दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर एक कर्मचारी व्यसनमुक्ती केंद्रात सध्या उपचार घेत आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर ते या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन आहेत. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बद्दल असलेला आदर अधिक वाढला आहे.
हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या
ड्रंक अँड ड्राइव करण्याचाच हा प्रकार होता हे आता स्पष्ट झालं आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. बुधवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हातखंबावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल आठ गाड्यांना ठोकल्याची घटना घडली होती. हे पोलीस कर्मचारी नाणीज येथील बंदोबस्त आटपून आपल्या ताब्यातील गाडी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत असताना हातखंब्याच्या पुढे कुंवारबावपर्यंत जवळजवळ आठ गाड्या त्यांनी धडक दिल्याची घटना घडली.
हे पण वाचा : या कारणांमुळे होतो गर्भपात
दरम्यान संबंधित पोलीस कर्मचारी हा एक्स मिलिट्री मॅन असून सध्या मुख्यालय येथे कार्यरत आहे. दरम्यान घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली असून काही गाड्या ह्या पर्यटकांच्या होत्या. पर्यटक रत्नागिरीतून बाहेर पडत असताना हा अपघात झाला. संबंधित पोलीस कर्मचारी हा दारू पिऊन गाडी चालवत होता का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कालच त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे.
हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा
त्याच्या मेडिकल टेस्टच्या रिपोर्टवरूनच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते. दरम्यान प्रवासी बाहेरचे असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती मात्र या सगळ्या प्रकारची दखल जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून घेण्यात आली आहे. एकाच वेळी सात ते आठ गाड्यांना ठोकल्याने अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे पण वाचा : LIC पॉलिसीमध्ये मुलांच्या नावे 150 रुपये गुंतवा अन् मोठा परतावा मिळवा
पोलीस कर्मचारी सुसाट असल्याने आता नागरिकांनी करायचं तरी काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र या सगळ्यावर आता कुणीही बेजबाबदारपणे वागल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि प्रशासनाने ही कठोर कारवाई करत योग्य तो इशाराच दिला आहे. चुकीचे वर्तन कराल तर याद राखा असाच संदेश गेला आहे.