एकनाथ शिंदे 50 आमदारांना खोके देताहेत पण... रामदास कदम बोलले..

माजी परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल माजी पर्यावरण मंत्री व शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.

Eknath Shinde gives boxes to 50 MLAs but... Ramdas Kadam spoke..
एकनाथ शिंदे 50 आमदारांना खोके देताहेत पण... रामदास कदम बोलले 
थोडं पण कामाचं
 • माजी परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल माजी पर्यावरण मंत्री व शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.
 • अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला
 • रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली

रत्नागिरी ( लोटे / खेड ), सचिन कांबळे : माजी परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल माजी पर्यावरण मंत्री व शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनाही अशीच लोकं शेजारी लागतात, असा टोलाही यावेळी रामदास कदम यांनी लगावला. (Eknath Shinde gives boxes to 50 MLAs but... Ramdas Kadam spoke..)


* रामदास कदम पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे. 

 1. अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले
 2. अनिल परब यांना अजून अटक का झाली नाही
 3. उद्धव ठाकरे यांना असलेच भडवे सोबत लागतात
 4. रामदास कदम यांची आक्षेपार्ह टीका
 5. गुवाहाटीच्या देवीमध्ये ताकद आहे
 6. मला पण एकदा दर्शनाला जायलाच पाहिजे
 7. रामदास कदम सुद्धा गुवाहाटीला जायच्या तयारीत
 8. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल
 9. रामदास कदम यांनी व्यक्त केला विश्वास
 10. मंत्री मंडळ लवकरच होण्याची शक्यता
 11. शिंदे-फडणवीस सरकार मधील दुसऱ्या टप्प्यातील मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार
 12. *हो एकनाथ शिंदे खोके देतात पण ते विकासकामांसाठी देतायत
 13. खोक्यां वरून आरोप करणाऱ्यांना शिंदे गटाचे सणसणीत उत्तर
 14. रामदास कदम यांनी विरोधकांचा घेतला समाचार
 15. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोके देतात पण ते विकासासाठी देतात
 16. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल
 17. रामदास कदम यांचे विरोधकांना आवाहन

खोक्यांची मुद्द्यावरून शिंदे गटाला टार्गेट केले जात असतानाच शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी विरोधकांना यावर सणसणीत उत्तर दिल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोके देतात पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देतात आणि खोक्यांवरून आरोप करणाऱ्यांनी एक तर बाप दाखवावा नाही तर श्राद्ध घालावे असे उलट आव्हानच रामदास कदम यांनी विरोधकांना दिले आहे.

 शिवसेना-भाजपा युती हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत संघर्ष केला त्यांच्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी आघाडी केली. गुवाहाटीला गेलेले सेनेचे सर्व आमदार मी परत आणत होतो पण राष्ट्रवादीची साथ सोडा एवढीच मागणी या आमदारांनी केली होती. पण पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका होती. त्यामुळे भविष्यात देखील भाजपा-शिवसेना युती कायम राहील असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी