नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, येत्या चार दिवसात कळेल जेल की बेल?

नितेश राणे (Nitesh rane) यांच्या अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी उच्च न्यायालयात  (High Court) धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे.

Nitesh Rane
चार दिवसात कळेल नितेश राणे बाहेर फिरणार की तुरुंगात जाणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळला होता.
  • राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार
  • सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता.

मुंबई : नितेश राणे (Nitesh rane) यांच्या अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी उच्च न्यायालयात  (High Court) धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. दरम्यान सत्र न्यायलयाने (Sessions Court) तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन  फेटाळला होता.  त्यानंतर नितेश राणेंनी मुंबईच्या उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान  राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता उच्च न्यायालयात तर दिलासा मिळणार का? असा प्रश्न अनेकजणांना पडला आहे.  

संतोष परब हल्ला प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळत राणेंना दणका दिला. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, नारायण राणे समर्थक मनीष दळवी बँकेचे अध्यक्ष तर अतुल काळसेकर उपाध्यक्ष झाले. याआधी बँकेच्या संचालक मंडळासाठी ३० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अकरा आणि विरोधकांचे (महाविकास आघाडी) आठ सदस्य निवडून आले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी