एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, पोलिसांनी बजावली नितेश राणेंना नोटीस

kankavli police send notice to bjp mla nitesh rane : भारतीय जनता पार्टीचे आक्रमक आमदार अशी ओळख असणाऱ्या नितेश राणेंना आता पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी एक नोटीस बजावली आहे. नितेश राणेंना ही नोटीस कणकवली पोलिसांनी बजावली आहे.

kankavli police send notice to bjp mla nitesh rane
पोलिसांनी बजावली नितेश राणेंना नोटीस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी नितेश राणेंना एक नोटीस बजावली आहे
  • एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी बजावण्यात आली आहे
  • राणे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत

कणकवली भारतीय जनता पार्टीचे आक्रमक आमदार अशी ओळख असणाऱ्या नितेश राणेंना आता पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी एक नोटीस बजावली आहे. नितेश राणेंना ही नोटीस कणकवली पोलिसांनी बजावली आहे. नितेश राणे यांना ही नोटीस एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी बजावण्यात आली आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत राणे यांचे नाव घेतले होते. त्यामुळे , नितेश राणेंना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

तक्रारदाराने आपल्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

सदर, प्रकरणातील तक्रारदाराचे नाव संतोष परब असं आहे. ते कणकवली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. संतोष परब हे काही दिवसांपूर्वी आपल्या दुचाकीवरून कणकवलीतील नरवडेनाका ते कनेडीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली असल्याची माहिती त्यांनी आपल्या तक्रारीत दिली आहे. त्यानंतर संतोष परब गाडीवरून खाली पडले आणि खाली पडल्यानंतर वाहनातील अज्ञात व्यक्तीने तू संतीश सावंत यांचे काम करतोस का? अशी धमकी देत चाकूने छातीवर वार करत हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोराने गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना कळवले पाहिजे असे म्हणत इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेला. असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, कणकवली पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, त्याअनुषंगाने आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

राणे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत

कोकणातील शिवसेनेत सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यातून लक्ष हटवण्यासाठी माझे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत आमदार नितेश राणे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून वकिलांनी पोलीस ठाण्यात माझ्यावतीने बाजू मांडली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

संतापलेल्या शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं असून, राणेंनी केलेल्या ट्विटमुळे  शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. दरम्यान,शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चूकीची माहीती ट्विटरद्वारे पसरवल्याचं सांगत काल रात्री मुंबईतल्या वरळी, भोईवडा, काळाचौकी आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी