राज्यात लॉकडाऊन अजून वाढणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत 

Lockdown in maharashtra । १ जूनपर्यंत नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray )यांनी संकेत दिले आहेत

Lockdown in the state will increase further, the Chief Minister indicated in ratnagiri
राज्यात लॉकडाऊन अजून वाढणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या संदर्भात कोकण दौऱ्यावर गेलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
  • कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी करोनाचे नियम मात्र पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले
  • १ जूनपर्यंत नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray )यांनी संकेत दिले आहेत

Lockdown in maharashtra ।  रत्नागिरी :  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा थैमान घातले आहे.  तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत आहे. मात्र तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी गोष्ट आहे.  राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन((Lockdown) वाढवले आहे. यातच, १ जूनपर्यंत नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray )यांनी संकेत दिले आहेत. (Lockdown in the state will increase further, the Chief Minister Uddhav Thackeray indicated in ratnagiri) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,  राज्यातील काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे, यामुळे पुढील काही काळात आपण निर्बंध शिथील करु. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले,  की, 'सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही कोरोना काळात गाफील राहू नये.'

तत्पूर्वी, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं होतं. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार, असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी