कणकवलीतील शिवसैनिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा; दिलं अटकेचं निवदेन

कोकणा (Konkan)मध्ये पुन्हा शिवसेना (Shiv Sena)विरुद्ध राणे (Rane) असा संघर्ष पेटला आहे.  शिवसैनिक (Shiv Sainik) संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला आणि विधिमंडळात पर्यावरण मंत्री (Environment Minister ) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची एन्ट्री होत असताना नितेश राणे यांनी काढलेल्या मांजरीच्या आवाजावर राजकीय वातावरण तापले आहे.

Morcha of Shiv Sainiks
नितेश राणेंना अटक करा, कणकवलीत शिवसैनिकआक्रमक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सकाळी अकराच्या सुमारास आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
  • कणकवलीत तणावाचे वातावरण झाल्याने पोलीस बंदोबस्त कमालीचा वाढवण्यात आला होता.

रत्नागिरी : कोकणा (Konkan)मध्ये पुन्हा शिवसेना (Shiv Sena)विरुद्ध राणे (Rane) असा संघर्ष पेटला आहे.  शिवसैनिक (Shiv Sainik) संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला आणि विधिमंडळात पर्यावरण मंत्री (Environment Minister ) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची एन्ट्री होत असताना नितेश राणे यांनी काढलेल्या मांजरीच्या आवाजावर राजकीय वातावरण तापले आहे. या दोन्ही घटनांचे राज्य विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. मात्र भाजप (BJP) मात्र राणे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले

कणकवली शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना आज आक्रमक झाली. आमदार वैभव नाईक संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले कणकवलीत तणावाचे वातावरण झाल्याने पोलीस बंदोबस्त कमालीचा वाढवण्यात आला होता. जिल्हा बँकेचे बेपत्ता असलेले मतदार प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

या प्रकरणाची दखल घेत राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले. या घटनेचे सर्व माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा मुख्यालयात बैठक घेतली शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या चार तासानंतर पुणे येथील चार संशयितांना अटक केली होती, नंतर आणखी दोघांना पकडण्यात आले यातील पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे तर एकला चार दिवसांची पोलीस कोठडी आहे दरम्यान या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांचा हात असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे

यात संशयित म्हणून सचिन सातपुते याला पकडल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले सातपुते हा भाजपशी संबंधित असून तो निलेश राणे यांचा समर्थक असल्याचा आरोप होत आहे यानंतर आमदार राणे यांना अटकेची शक्यता वर्तवली जाऊ लागली.  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर दडपशाहीचे आरोप केले. याचपार्श्वभूमीवर आज कणकवलीमधील शिवसेना आक्रमक झाली सकाळपासून शिवसेनेचे कार्यकर्ते कणकवलीत दाखल झाले होते. सकाळी एकत्र जमल्यानंतर त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी