रायगडावर खासदार संभाजी छत्रपती आक्रमक; १६ मार्चला होणार पहिल्या मराठा मोर्चा

खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati) यांनी अखेर रायगडावरून (Raigad) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)च्या आंदोलनाची घोषणा केली.

MP Sambhaji Chhatrapati Raigad
रायगडावर खासदार संभाजी छत्रपती आक्रमक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मराठा आरक्षणावरुन संभाजी छत्रपती आक्रमक
  • कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आंदोलन करणार
  • मी समाजाला वेठीस धरणार नाही -खासदार संभाजी छत्रपती

रायगड: खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati) यांनी अखेर रायगडावरून (Raigad) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)च्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर (Kolhapur)मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं घोषणा संभाजी छत्रपती यांनी यावेळी सांगितलं. यावेळी संभाजी महाराज आक्रमक झाले असून त्यांनी आधीच्या आत्ताच्या सरकारला इशारा देत एकमेंकांकडे बोट दाखवण्याचा खेळ थांबवा असं म्हटलं आहे.  (Maratha Morcha will be held on March 16 )

348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करताना आधीचं आणि आजचे सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.

समाजाची दिशाभूल करणार नाही

लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचे संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझे काही चुकलं असेल तर मी दिलगिर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असे संभाजी छत्रपती यावेळी  म्हणाले. मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असे आवाहन त्यांनी केले.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी