कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद 

Kokan Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे. पुलाजवळ सुरक्षारक्षक तैनात केलेत.

Mumbai Goa Highway
कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद 
  • जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
  • कोकणात पावसाचा जोर कायम

रत्नागिरीः कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई- गोवा महामार्गावरचा जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसंच पुलाजवळ सुरक्षारक्षक आणि पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी आणि चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांना पूर आला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

चिपळूण तालुक्यातली वाशिष्ठी आणि शिव नदीलाही पूर आला आहे. गुरूवारी संध्याकाळी पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यानंतर नद्यांचं पाण्यामुळे शहरातल्या बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हे भाग पाण्याखाली गेले.  बहादूरशेख नाक इथला पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद केली आणि ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. तसंच पर्यायी मार्गाचा वापर करण्यास जरी सांगण्यात आलं असले तरी त्या मार्गावरील बाजार पुलावरही पाणी आल्यानं खेडकडून महामार्गावरून चिपळूण शहराकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे. 

कोकणात पाऊस कायम 

तळ कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भाग जलमय झाला आहे. जोरदार पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पूरस्थिती सारखी अवस्था निर्माण झाली आहे. अनेक रस्त्यावर वाहतूकीचा वेग देखील मंदावला आहे.  याआधी जगबुडी नदीवर नवीन पुलाचा जोड रस्ता खचला.  त्या जोड रस्त्याला मोठंमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आधीच त्रस्त झाले होते. 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली, खेड, देवरूख, साखरपा, लांजा, राजापूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अंतर्गत वाहतूक सुद्धा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी विजेची समस्या देखील उद्भवत आहे. दुसरीकडे बळीराजा आनंदी असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती

दरम्यान पावसानं विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पावसानं जोर धरला होता. गोरेगाव, परळ, लालबाग, मीरा रोड या ठिकाणी सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या.पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साचले होतं. कांजुरमार्ग, विक्रोळी स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद  Description: Kokan Rain: कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत आहे. पुलाजवळ सुरक्षारक्षक तैनात केलेत.
Loading...
Loading...
Loading...