मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली; 75 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील सडवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चोळई गावात गेल्या वर्षी उत्खनन झालेल्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यंदा दरड कोसळली आहे.

Mumbai-Goa National Highway land sliding, Safe evacuation of 75 citizens
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गा दरड कोसळली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उत्खननातून भुस्खलनाचा धोका भविष्यात वाढणार?
  • मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील सडवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चोळई येथे झाली घटना
  • मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार एलऍण्डटी कंपनीने गेल्यावर्षी या उत्खननाची जबाबदारी नाकारल्याने खासगीरित्या हे उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले होते.

रत्नागिरी :  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील सडवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चोळई गावात गेल्या वर्षी उत्खनन झालेल्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यंदा दरड कोसळली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार एलऍण्डटी कंपनीने गेल्यावर्षी या उत्खननाची जबाबदारी नाकारल्याने खासगीरित्या हे उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पोलादपूर तालुका आपत्ती निवारण कक्षाने तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चोळईतील सुमारे 75 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांनी दिली. (Mumbai-Goa National Highway collapses; Safe evacuation of 75 citizens)

अधिक वाचा : ​टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच! समोर आली ही मोठी बातमी

गेल्या वर्षी मोठयाप्रमाणात चोळई गावात महामार्गालगत माती उत्खनन होत असताना संबंधित यंत्रणेने ग्रामस्थांच्या अर्जांची दखल न घेता हितसंबंध जोपासल्याची चर्चा सुरू होती. अशातच, तालुक्यात मातीमाफियांनी अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या उत्खनन करून अतिवृष्टीकाळात भुस्खलन होईल, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवल्याने प्रशासनाकडून अभय मिळत गेले. यामुळे भुस्खलनासह लोकांच्या जिवितास तसेच मालमत्तेस धोका निर्माण होऊनही ग्रामस्थांच्या अर्जांकडे दूर्लक्ष केले गेले. अखेरिस, निसर्गाने त्याचे काम चोख बजावले आणि गेल्या वर्षी न कोसळलेली दरड यावर्षी मात्र कोसळू लागली.

अधिक वाचा : ​३९ चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे - अजित पवार

 पोलादपूर तालुक्यात रात्रीपासूनच धुवाँधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. गेल्यावर्षी याठिकाणी उत्खननामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन चोळईच्या ग्रामस्थांनी उठाव केला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टीकाळात दरड न कोसळल्याने कोणताही संघर्ष झाला नव्हता. यंदा पावसाचा जोर वाढताच चोळई येथीलया उत्खननाच्याठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून चोळई येथील 20 कुटुंबांतील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्यामंदिर पोलादपूर येथे हलविले असल्याचा दावा केला आहे. मात्र, याठिकाणी अनेक ग्रामस्थांनी जीवाच्या भितीने आपआपल्या परगावांतील नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गांव आणि ग्रामस्थ रिकामे करण्यासाठी प्रशासनाने बळाचा वापर केल्याचे यावेळी ग्रामस्थांचे मत झाल्याचेही अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.

अधिक वाचा : "आम्ही आपलं दु:खं सांगायला जायचो, पण चहा पेक्षा किटली गरम"

दरडी कोसळल्याच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा भाग कापण्यात आला असून पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे दगड मातीसह महामार्गावर खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले. यामुळे पोलादपूर तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी