Narayan Rane अलिबाग न्यायालयात दाखल, सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय झालं?

narayan rane on uddhav thackeray : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आज त्यांनी अलिबाग कोर्टात हजेरी लावली.

थोडं पण कामाचं
  • नारायण राणेंनी अलिबाग कोर्टात हजेरी लावली
  • तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंवर टिका
  • केस निकाली काढण्याची मागणी

रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जनआर्शिवाद यात्रेदरम्यान रायगडच्या महाडमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने महाड, नाशिक आणि पुण्यात राणेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संगमेश्वर येथे त्यांना अटक केल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांनी अलिबाग कोर्टात हजेरी लावली. (Narayan Rane filed in Alibaug court, what actually happened in the court during the hearing?)

अधिक वाचा : मुंबईत भररस्त्यात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग, 2 अटकेत

नेमके काय आहे प्रकरण

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात त्यांचा आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून गोंधळ उडाला. 

यावरुन नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका करत "बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती", असं वादग्रस्त वक्तव्य केलं.

अधिक वाचा : Nandurbar Road accident : नंदूरबारमध्ये रस्त्यांचे निकृष्ट काम, खडी आणणार्‍या डंपरचाच अपघात

नारायण राणेंच्या वक्तव्याने राज्यातील वातावरण पेटलं. शिवसेना आक्रमक होत मुख्यमंत्र्यांबद्दल बदनामीकारक वक्तव्य, द्वेषभाव निर्माण करणारी विधानं करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, यामुळे नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली. पण राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला अन् त्यांना संगमेश्वरमध्ये पोलिसांनी जेवत्या ताटावरून अटक केली होती. 

राणेंचे वकील काय म्हणाले 

दरम्यान त्यांना जामीन मिळाला होता. आज नारायण राणे यांनी अलिबाग कोर्टात दाखल झाले. ते मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर झाले. तसेच पुढील सुनावणीला गैर हजर राहण्यास परवानगी मिळावी यासाठी अर्ज सादर केला. त्यामध्ये ही केस खोटी असून ती निकाली काढावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता या केसची पुढील सुनावणी पुढील सुनावणी 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी