Narayan Rane Gets Bail : नारायण राणेंना एक आठवडा कोठडी द्या, पोलिसांची होती इच्छा; न्यायालय म्हणाले 'नो'

पोलिसांनी न्यायालयात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती नाकारली.

Narayan Rane Gets Bail
महाड न्यायालयाकडून नारायण राणेंना जामीन मंजूर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी न्यायालयात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती.
  • सुनावणीवेळी नारायण राणे यांच्या पत्नी, नितेश राणे, निलेश राणे, न्यायालयात हजर
  • नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर राणे समर्थकांनी सिंधुदुर्गात जल्लोष

रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी काल महाड (Mahad) येथील पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली. राज्यातील राजकीय वातावरणात गरमी वाढली आणि शिवसेना-भाजपची (Shiv Sena-BJP) कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यानंतर झालेल्या हाय होल्टेज ड्रामेनंतर नारायण राणेंना अटक झाली आणि रात्री महाड न्यायालयाकडून ( Mahad Court) जामीनही (Bail ) मिळाला. 

आठवडाभर कोठडी द्या 

नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचे म्हणत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी न्यायालयात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती नाकारली. भविष्यात असे प्रक्षोभक वक्तव्य करू, नये असे लिहून देण्याची मागणीही पोलिसानी न्यायालयात केली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर नारायण राणेंना जामीनाचा अर्ज मंजूर झाला आहे. 

दरम्यान नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर राणे समर्थकांनी सिंधुदुर्गात जल्लोष केला. सुनावणीवेळी नारायण राणे यांच्या पत्नी, नितेश राणे, निलेश राणे, भाजप कार्यकर्ते न्यायालयाच्या परिसरात हजर होते. याचबरोबर भाजपा नेते व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने न्यायालयाच्या आवारात जमलेले होते.

20 मिनिटांपेक्षा अधिक काळ युक्तीवाद 

महाड न्यायालयात सरकारी वकील आणि राणेंच्या वकीलामध्ये जबरदस्त युक्तीवाद झाला. नारायण राणेंच्या या विधानामुळे दोन्ही बाजूच्या वकिलांना  न्यायालयात आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. नारायण राणे जबाबदार व्यक्ती आहेत, असे असतानाही ते बेजबाबदारीने का वागले? असा प्रश्न सरकारी वकिलाकडून उपस्थित करण्यात आला होता.

तर, नारायण राणेंच्या वकीलानी यावर युक्तीवाद करत म्हटलं की, त्यांच्यावर लावली गेलेली कलमं चुकीची आहेत ,असे सांगण्यात आले होते. 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ हा युक्तीवाद सुरू होता. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद केला. जवळपास तासभर न्यायालयाचं कामकाज चालले.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी