सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेचे लक्ष नको तेथे वळविण्यासाठी ही अशी भाषणे करत आहेत. बकवास आणि आकसाचे भाषण होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचा गेल्या ४९ वर्षात मर्दपणा दिसला नाही. आणि म्हणे मर्द..! बीजेपी, आरएसएस यांच्या कार्यावर बोलण्याची तुमची लायकी तरी आहे काय? आधी तुम्ही काय काम केले ते सांगा. पंतप्रधान मोदींवर टीका करता, तुमची लायकी तरी आहे काय ? मुख्यमंत्री आणि शिवसेना नेता म्हणून काय कार्य केले दाखवा, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिले.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे पडवे मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ.मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत, दादा साईल, उपस्थित होते. ज्या शहरात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभा घेतली, तेथे ७ दिवसाने एकदा पाणी येते असे हे औरंगाबाद शहर आहे. तेथे सभा घेऊन काय बोलता. कसले मुख्यमंत्री? कशाला खुर्चीत बसता?. बसायला येत नाही तरी. राज्य 10 वर्षे मागे नेले. विकासाचे ज्ञान नाही. की काय करावे हे कळत नाही. गेल्या अडीच वर्षात नारायण राणे यांच्या घराला नोटीस दिले हे एकमेव काम या मुखमंत्र्यांनी केले. मी पळपुटा नाही. त्यामुळे भाजपा धमक्या आणि नेत्यांवर टीका केल्यास जशास तसे आणि त्या पेक्षा जास्त जोराने उत्तर देऊ असा इशारा यावेळी दिला.
कोरोनात जे लोक दगावले त्यांना मोदींनी आर्थिक मदत केली. मात्र राज्य सरकार काहीच मदत देऊ शकले नाही. भाजपावर टीका करताना कार्टी असा शब्द वापरला त्याचा समाचार घेतांना नारायण राणे म्हणले, सुशांत सिंग, दिशा सलीयना, पूजा चव्हाण, प्रकरणी आम्ही गृहमंत्री शहा यांची भेट घेणार आहोत. मग तुमची कार्टी त्यात काय दिवे लावले आहेत ते कळेल. बाळासाहेब असते तर मुख्यमंत्री पद घेतले नसते. मला मुख्यमंत्री केले तेव्हा उद्धव ठाकरे होते मात्र त्याना मुख्यमंत्री न करता मला केले एक शिवसैनिक म्हणून. तुम्ही शिवसैनिकाना काय दिले, रायगडला जमिनी घेताना तुमचे नातेवाईक दिसले. आता काही नातेवाईक ऑस्ट्रेलियात आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.