Sindhudurg : नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपची सरशी होईल - नारायण राणे

Narayan Rane said BJP will win the upcoming Nagar Panchayat elections : महाराष्ट्रात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी होईल - नारायण राणे

Narayan Rane said BJP will win the upcoming Nagar Panchayat elections
Sindhudurg : नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपची सरशी होईल - नारायण राणे 
थोडं पण कामाचं
  • Sindhudurg : नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपची सरशी होईल - नारायण राणे
  • स्थानिकांना हवा आहे जैतापूर प्रकल्प
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मुक्काम ठोकणार

Narayan Rane said BJP will win the upcoming Nagar Panchayat elections : सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी होईल, असा विश्वास केंद्रीयमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात कोरोनाकाळात झालेले मृत्यू आणि राज्याच्या इतर आर्थिक हानीसाठी राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. 

आधी ओबीसी कोट्यात आरक्षित असलेल्या आणि आता खुल्या प्रवर्गात समाविष्ट केलेल्या जागांसाठी १८ जानेवारी २०२१ रोजी तर इतर ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरेल. निवडणुकीत भाजपचीच सरशी होईल, असा विश्वास केंद्रीयमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला.

स्थानिकांना हवा आहे जैतापूर प्रकल्प

जैतापूर प्रकल्प स्थानिकांना हवा आहे. प्रकल्प होण्याआधीच जैतापूरमध्ये कोणकोणत्या पक्षांतील कोणत्या नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत याचा तपास करणे आवश्यक आहे. जैतापूर आणि भोवतालच्या परिसरात भाजपाने नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत; असे नारायण राणे म्हणाले. 

कोरोनाकाळात चांगले काम केले

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले. लोकांना चांगली सेवा पुरवली. या उलट राज्यातील कोरोना मृत्यूसाठी ठाकरे सरकारच जबाबदार आहे; असा आरोप नारायण राणे यांनी केला.

जिल्ह्यात मुक्काम ठोकणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मुक्काम ठोकणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी