नारायण राणे समर्थक मनीष दळवी झाले सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष

Narayan Rane supporter Manish Dalvi chairman of Sindhudurg Bank : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांचे समर्थक असलेले भारतीय जनता पार्टीचे सदस्य विजयी झाले. नारायण राणे समर्थक मनीष दळवी बँकेचे अध्यक्ष तर अतुल काळसेकर उपाध्यक्ष झाले.

Narayan Rane supporter Manish Dalvi chairman of Sindhudurg Bank
नारायण राणे समर्थक मनीष दळवी झाले सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष 
थोडं पण कामाचं
  • नारायण राणे समर्थक मनीष दळवी झाले सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष
  • मनीष दळवी बँकेचे अध्यक्ष तर अतुल काळसेकर उपाध्यक्ष
  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दळवींना अकरा मते

Narayan Rane supporter Manish Dalvi chairman of Sindhudurg Bank : सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांचे समर्थक असलेले भारतीय जनता पार्टीचे सदस्य विजयी झाले. नारायण राणे समर्थक मनीष दळवी बँकेचे अध्यक्ष तर अतुल काळसेकर उपाध्यक्ष झाले. याआधी बँकेच्या संचालक मंडळासाठी ३० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अकरा आणि विरोधकांचे (महाविकास आघाडी) आठ सदस्य निवडून आले. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा राहणार हे आधीच स्पष्ट झाले होते.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दळवींना अकरा मते मिळाली. दळवींच्या विरोधात फक्त सात मते पडली. विरोधी गटातील एका सदस्याने आयत्यावेळी मतदान केले नाही. यामुळे मनीष दळवी अकरा विरुद्ध सात असे चार मतांच्या फरकाने जिंकले. 

संतोष परब हल्लाप्रकरणी मनीष दळवी हे आरोपी आहेत. याच प्रकरणात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

सिंधुदुर्गात राणे पॅटर्नची सरशी, जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का

काय म्हणाले नारायण राणे?

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीने जिंकली. या विजयानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत विजयी झालेल्यांचे अभिनंदन केले आणि बँकेवर हक्क गाजवण्यासाठी आलेल्या विरोधकांवर टीका केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक जनहिताची कामं करेल; असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. तसेच विरोधकांना निवडणूक निकालातून अकलेचे धडे मिळाले; असेही राणे म्हणाले.

मी बँकेकडून कर्ज घेतले आहे आणि ते नियमित फेडतो. बँकेत माझे फारसे येणेजाणेही नाही. पण जनहिताच्या कामांसाठी स्थापन केलेल्या बँकेने लोकांच्या भल्यासाठी काम करावे यासाठी अंकुश ठेवून आहे एरवी बँकेच्या कारभाराशी माझा संबंध नाही; असे राणेंनी सांगितले. ज्याने आयत्यावेळी गद्दारी केली त्याला जिल्ह्यात तोंड दाखवायला जागा उरलेली नाही; असे नारायण राणे कोणाचेही नाव न घेता म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी