किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करू पाहा, निलेश राणेंनी दिलं खुलं आव्हान

आमदार संजय कदम यांनी किरीट सोमय्या यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मांडली आहे. यावर निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले आहे.

Breaking News
किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करू पाहा, निलेश राणेंनी दिला शिवसेनेला इशारा  
थोडं पण कामाचं
  • किरीट सोम्मया हे दि.26 मार्चला दापोली येथे  मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अजून पडले गेले नाही या करीता येत आहेत,
  • त्यांच्या या दौऱ्याला म. वि.आ. कडून विरोध होताना पाहायला मिळतोय.
  • यावर आमदार संजय कदम यांनी किरीट सोमय्या यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मांडली आहे.

रत्नागिरी :  किरीट सोम्मया हे दि.26 मार्चला दापोली येथे  मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अजून पडले गेले नाही या करीता येत आहेत, त्यांच्या या दौऱ्याला म. वि.आ. कडून विरोध होताना पाहायला मिळतोय. यावर आमदार संजय कदम यांनी किरीट सोमय्या यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मांडली आहे. यावर निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले आहे.

अधिक वाचा :  प्रताप सरनाईक यांना दणका, ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त

 ही भाषा कुठली थांबवायची, कोणाला धमकी देत आहेत. याचा विचार करा. आम्हीही मग जशास तसे उत्तर देऊ असे निलेश राणे म्हणाले. रिसॉर्ट हा वैयक्तीक प्रश्न आहे. पैसे खाऊन रिसॉर्ट बांधला, तो अनधिकृत रिसॉर्ट पाडला की नाही हे पाहण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या येत आहेत. आम्ही बुलडोजर थोडीच घेऊ येत आहोत. प्रशासनाला जाब विचारायला येत आहोत, असेही राणे म्हणाले. 

अधिक वाचा : कोमो स्टॉकमध्ये आदित्य, तेजस, रश्मी ठाकरे पार्टनर : सोमय्या

निलेश राणे यांंनी यावेळी मुख्यमंत्री यांच्या मेव्हण्या बाबतही विधान केले आहे.ते म्हणाले मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा अडकल्यावर लगेच ते ऍक्टिव्ह झाले सभागृहात आले. त्यांची कंबरपण बरी झाली आणि बाकी दुखणे पण कमी झाले. नाहीतर दोन वर्ष महाराष्ट्र रडत होता तेव्हा मुख्यमंत्री एव्हडे ऍक्टिव्ह दिसले नाहीत. तसेच रिफायनरी प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले सरकार शिवसेनेचे आहे. यांना गांधीजीच लागतात आणि गांधीजीची काही देवाणघेवाण झाली असेल आणि म्हणून यांना प्रकल्प हवा असेल असे निलेश राणे म्हणाले ते रत्नागिरीत आले असता त्यांनी हे वक्तव्य केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी