'बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला', निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला 

माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Nilesh Rane And Uddhav Thackeray
बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला, नितेश राणेंचा टोला  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
  • उद्धव ठाकरेंची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणे पिता- पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
  • निलेश राणे यांनी लगेचंच ट्विट करून उद्धव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणे पिता- पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या हल्लाबोलनंतर राणे कसले गप्प बसतायत. निलेश राणे यांनी लगेचंच ट्विट करून उद्धव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

निलेश राणे यांनी ट्विट करून त्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं असून ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू. 

कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. पण तरीही शिवसेनेनं त्यांच्याविरोधात शिवसेनेचे एके काळचे राणेसमर्थक सतीश सावंत यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. 

उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले

शिवसेना प्रमुखांनी २००५ मध्ये यांना लाथ मारून हाकलून दिले होते.  अशी खुनशी वृत्ती मी माझ्या भगव्याभोवती फिरकू देणार नाही आणि माझ्या मित्रासोबतही ही वृत्ती नको. ही पाठीत वार करणारी वृत्ती आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

रामायणातील मायावी राक्षस

रामायणात मायावी राक्षस होते. तसेच आताच्या राजकारणात मायावी राक्षस आहेत. ते काँग्रेसच्या रुपात आले. नंतर स्वाभिमानीच्या रुपात आले आणि आता भाजपच्या रुपात अवतरले आहे. माझा लढा या खुनशी वृत्तीशी आहे. त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या. मी म्हणतो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार तर त्यावर ते म्हणतात, उद्धव ठाकरेंना सात बारा तरी कळतो का. तर मी जमिनी हडपण्याचे धंदे करत नाही, त्यामुळे मला सातबारा माहिती नाही.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझा सल्ला आहे. अशा लोकांना भाजपपासून दूर ठेवा, हेच सांगायला मी या ठिकाणी आलो आहे. 

मातोश्रीच्या मीठाला न जागलेला 

१० रुपयांत जेवणाच्या शिवसेनेच्या घोषणेवर हे म्हणाले, काय जेवण मातोश्रीतून जाणार आहे का? मातोश्रीच्या मीठाला न जागलेल्यांनी आम्हांला शिकवू नये, असाही टोला उद्धव यांनी लगावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी