नितेश राणेंची तब्येत बिघडली

Nitesh Rane's health deteriorates, likely to be admitted to hospital : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. हा आदेश जारी झाल्यानंतर काही तासांतच नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आले आहे.

Nitesh Rane
नितेश राणेंची तब्येत बिघडली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नितेश राणेंची तब्येत बिघडली
  • नितेश राणे यांनी सावंतवाडी कारागृहाऐवजी रुग्णालयात दाखल केले जावे अशी विनंती करणारा अर्ज तुरुंग अधीक्षकांना दिला
  • अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही

Nitesh Rane's health deteriorates, likely to be admitted to hospital : सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. हा आदेश जारी झाल्यानंतर काही तासांतच नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आले आहे. नितेश राणे यांनी सावंतवाडी कारागृहाऐवजी रुग्णालयात दाखल केले जावे अशी विनंती करणारा अर्ज  तुरुंग अधीक्षकांना दिला आहे. या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच हा राजकीय आजार नसावा असा टोमणा मारला. तर नितेश राणेंच्या वकिलाने नितेश राणे यांची तब्येत आधीपासूनच बिघडली असल्याचे सांगितले. कोर्टाच्या आदेशाचे पालन करायचे म्हणून नितेश राणे पोलीस कोठडीत गेले होते. पण त्यांच्या तब्येतीबाबत आम्ही कोर्टाला माहिती दिली आहे; असे नितेश राणेंचे वकील म्हणाले. डॉक्टर तपासण्या करून पुढील निर्णय घेतील; असेही नितेश राणेंचे वकील म्हणाले. 

याआधी कोर्टाने शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे आणि त्यांचे समर्थक राकेश परब या दोघांना न्यायालयीन कोठडी दिली. कोर्टाने नितेश राणेंना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. हा आदेश आल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे आणि राकेश परब या दोघांना ओरोस येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. 

वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू असतानाच नितेश राणे यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात अर्थात सेशन्स कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. याआधी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांनी शरणागती पत्कारली नसल्याचे सांगत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, आता नितेश राणे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना रितसर जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी