Beating of Shiv Sainik Case : मुंबई : शिवसैनिकावर (ShivSena Worker) झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Attack) सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) मोठ्या घडामोडी घडत आहेत. अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज करून नॉट रिचेबल असेलले नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहेत. त्याच वेळी केंद्रीय मंत्री (Union Minister) नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. आज दुपारी तीन वाजता कणकवली (Kankavli) पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस बाजवण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली आहे. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता की, नितेश राणे सध्या कोठे आहेत? परंतु, ते कोठे आहेत हे मला माहित असेल तरी मी तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी पत्रकारांना उत्तर देताना केला होता. नारायण राणे यांच्या याच वक्तव्यावरू त्यांना नितेश राणे कोठे आहेत हे खरंच माहित आहे का? हे जाणून घेण्यासाठी कणकवली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे. एवढीशी मारहाण झाली असं म्हणत राणेंनी मारहाणीचं समर्थन केलं. केंद्रीय मंत्र्याने असं समर्थन करणे योग्य नाही. नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना माहिती आहे. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे माहिती लपवू शकतात, पण पोलिसांनी नोटीस पाठवून योग्य निर्णय घेतला आहे," असं शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या नोटीसीवर सध्या काहीही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. तर नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सत्तेचा अहंकार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर शंभुराजे देसाई म्हणाले की, माझ्याकडे अधिकृत माहिती नाही, अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल. संबंधित तपास अधिकाऱ्यांनी नोटीस दिली असेल तर तपासाचा भाग असू शकतो. नारायण राणे यांचं वक्तव्य सर्वांनीच ऐकलं, मला माहिती असेल तरी नितेश राणे कुठे आहेत हे कशाला सांगू? असं नारायण राणे म्हणाले होते. त्याबाबत राणेंना नोटीस पाठवली असू शकते. अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.