'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा'; सामन्यातून टीका करणाऱ्या शिवसेनेला राणेंचं 'प्रहार' मधून उत्तर

राणेंनी यांनी आपल्या 'प्रहार' वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Narayan Rane
नारायण राणे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सामना या मुखपत्रातून शिवसेना वारंवार भाजपवर टीका करत असते.
  • प्रहारच्या माध्यमातून नारायण राणे सामन्याचा घेणार बदला
  • चिपी विमानतळाच्या उद्घाघाटनाप्रसंगी नारायण राणेंवर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती.

रत्नागिरी :  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नारायण राणे हे नेहमी एकमेंकांवर टीका टिप्पणी करत असतात. चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्धघाटनाप्रसंगी दोघांची टोलेबाजी आपण पाहिली. आता परत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' असे थेट आव्हान राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

राणेंनी यांनी आपल्या 'प्रहार' वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आपल्या मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर टीका करत होती. आता त्याचा बदला काढण्यासाठी राणेंनी देखील आपल्या प्रहार या वृत्तपत्रातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आजच्या प्रहारमध्ये देखील 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात असं सदर छापून आले आहे. प्रहार पेपरच्या पहिल्याच पानावर हा मथळा छापला गेला आहे. गुरुवारच्या प्रहार पेपरच्या अंकात 'हार आणि प्रहार' या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष्य करणार आहेत.

'प्रहार'च्या आजच्या अंकात याबाबत सांगितले आहे की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीने पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत आणि घणाघाणी प्रहार, 'हार आणि प्रहार', उद्याच्या अंकात वाचा. 
शिवसेनेचा दसरा मेळवा नुकताच पार पडला यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला होता.

केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर भाजप करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता. चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी