रत्नागिरीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट; तिघांचा मृत्यू, ४० ते ५० कर्मचारी कंपनीत अडकल्याची भीती

Blast in Chemicl factory in Ratnagiri: रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत असलेल्या घरडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत आग सुद्धा लागली आहे. 

Ratnagiri massive blast in Gharada chemical factory in lote MIDC
रत्नागिरीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट
  • स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट 
  • पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, मदत आणि बचावकार्य सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीत सकाळच्या सुमाराच स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग सुद्धा लागली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात कंपनीतील काही कर्मचारी जखमी झाले असून तिघांचा मत्यू झाला आहे. तर जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये. (Ratnagiri massive blast in Gharada chemical factory in lote MIDC)

कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याने काही कर्मचारी कंपनीतच अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

आठवड्याभरात एमआयडीसीत दुसऱ्यांदा स्फोट

गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता घरडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी