Santosh Parab attack case: नितेश राणेंना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणेंना (Nitesh Rane) जामीन (Bail) मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) त्यांना दिलासा दिला आहे. शिवसैनिक संतोष परब (Shiv Sainik Santosh Parab)यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Nitesh Rane granted bail
नितेश राणेंना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.
  • परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत.
  • संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंना सुरुवातीला पोलीस कोठडी देण्यात आली होती.

सिंधुदुर्ग : भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणेंना (Nitesh Rane) जामीन (Bail) मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) त्यांना दिलासा दिला आहे. शिवसैनिक संतोष परब (Shiv Sainik Santosh Parab)यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.

मंगळवारी (8 फेब्रुवारी) जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकिल, जेष्ठविधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंना सुरुवातीला पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. 

काय आहे प्रकरण?

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते.या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे.

या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी