Shivrajyabhishek Din 2021 Date and time: कधी आहे शिवराज्याभिषेक सोहळा, यंदा सोहळ्याला अनोख्या नावाने संबोधणार

हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येतो. 

shivrajyabhishek din 2021 celebrated on 6th june at Fort raigad this year called as shivswaraj din
कधी आहे शिवराज्याभिषेक सोहळा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  •  'शिवस्वराज्य दिन' म्हणून होणार साजरा; 6 जून रोजी रायगडावर निनादणार महाराजांचा जयघोष
  • हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
  • शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला.

Shivrajyabhishek Din 2021: हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराजांना मानचा मुजरा देण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट होणार आहे. हा सोहळा आता  'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याची महती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून हा निर्णय राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. 

असा पार पडला होता शिवराज्याभिषेक 

प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळाचे वर्णन आपण ऐकले तर तो एक दैदिप्यमान सोहळा होता. यात राजांचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले.  हे दोन मुख्य विधी पार पडल्यानंतर महाराज छत्रपती झालेत.  यावेळी शिवाजी महाराजांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. हाताची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक शिवपिंडीवर करुन महाराजांना हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी मंत्रोच्चारण करत शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा केला. त्यानंतर 32 मण सोन्याने सजवलेल्या भव्य सिंहासनावर महाराज आरुढ झाले.  छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन महाराजांवर अतूट प्रेम करणाऱ्या प्रजेने महाराजांना अंतःकरणातून आशीर्वाद दिले.  सोन्याचांदीचे फुले उधळली गेली होती असे वर्णन शिवराज्याभिषेक सोहळ्याचे केले जाते. ऐतिहासिक पुस्तकांत हे वर्णन ऐकून मन प्रफुल्लीत होते. 

असा होता दुसरा दिवस 

सोहळा इतक्यावरच थांबला नाही तर दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या देखली तुला करण्यात आल्या.

कोरोनाचे नियम पाळून होणार सोहळा

राज्याभिषेकादिवशी शिवरायांना 'शिवछत्रपती' होण्याचा सन्मान मिळाला. दर वर्षी या दिवशी रायगड शिवभक्तांनी सजतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने राजगड दुमदुमून जातो. रायगड झेंडूंच्या फुलांनी सजतो. शिवरायांच्या भगव्याने वातावरण भगवामय होते.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करुन स्रागसंगीत पूजन होते. इतर कार्यक्रम पार पडतात. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदा कोरोना व्हायरस महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता येणार नाही.

ऑनलाइन दिसणार शिवराज्याभिषेक सोहळा

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचा व्हिडीओ थोड्याच वेळात ऑनलाइन बघता येईल. शिवरायांच्या भक्तांना फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून घरातूनच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्त्व

शिवराज्याभिषेक सोहळ्याला मराठी साम्राज्याच्या इतिहासात महत्त्व आहे. या राज्याभिषेकामुळे सर्वत्र मराठा साम्राज्य स्थापन झाल्याचे जाहीर करणे शक्य झाले. शिवाजी राजांचा राज्याभिषेक जमिनीपासून ५ हजार फूट उंचीवर रायगड किल्ल्यात पार पडला. शिवराय ३२ मण सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर विराजमान झाले. या सोहळ्यात त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात. शिवाजी महाराजांनी प्रगतीसाठी भाषाशुद्धीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. भाषेतले फारसी शब्द दूर करुन त्या जागेवर मराठी आणि निवडक संस्कृत शब्द त्यांनी वापरात आणले. नवे होन नावाचे चलन सुरू केले. यासाठी सोन्याची २.७ आणि २.९ ग्रॅम वजनाची चलनी नाणी तयार करण्यात आली. तसेच तांब्याचे शिवराई नावाचे चलनही त्यांनी सुरू केले. 

शिवरायांना वडील शहाजीराजे यांच्याकडून २ हजार मावळ्यांची फौज मिळाली होती. पण अल्पावधीत स्वतःच्या हिंमतीवर शिवाजी महाराजांनी १ लाखांपेक्षा जास्त मावळ्यांचे सैन्य उभे केले. भारतातले पहिले आरमार (नौदल) शिवरायांनी स्थापन केले. शिवाजी महाराजांचे सैन्य गनिमी काव्यानं (गुरिल्ला वॉरफेअर हा आताचा प्रचलित शब्द) लढण्यात हुशार होते. त्या काळात शत्रू म्हणजे गनिम आणि त्याच्यावर मात करण्याचा डाव म्हणजे कावा या अर्थाने गनिमी कावा हा शब्द विकसित झाला होता. शिवाजी महाजांपासून सुरू झालेले मराठा साम्राज्य पुढे पेशवाईच्या काळात अफगाणिस्तानमधील अटक या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचले.

भारतातील सर्वात मोठा भूप्रदेश पेशवाईच्या नियंत्रणात  होता. राजे असंख्य होते. पण हे राजे पेशव्यांच्या हुकुमांचे ताबेदार होते. भारताच्या इतिहासाचे वैशिष्ट्य म्हणजे पानिपत या ठिकाणी अब्दाली विरुद्धच्या पहिल्या संघर्षात मराठा साम्राज्याची मोठी हानी झाली पण मराठ्यांच्या लढाऊ बाण्याचा धसका घेऊन अब्दालीसह परदेशांतील राजांनी भारतात प्रवेश करण्याचा विचार मनातून काढून टाकला. स्वतः अब्दाली युद्धात झालेल्या मोठ्या हानीमुळे पानिपतावर जिंकूनही माघारी गेला. ही परिस्थिती भारतात युरोपमधून व्यापाऱ्यांच्या आडून सैनिकांनी प्रवेश करेपर्यंत कायम होती. पण इंग्रजांनाही शेवटी नानासाहेब पेशवे यांना  हरवल्यानंतरच संपूर्ण भारतावर साम्राज्य स्थापन करणे शक्य झाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी