VIDEO: अजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज, दृश्य धडकी भरवणारी

रत्नागिरी येथील मिऱ्या समुद्र किनारी एका भरकटलेले जहाज अजस्त्र लाटामद्ये अडकल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

strong winds and waves hit mirya port in ratnagiri a big ship stuck in the waves 
VIDEO: अजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज, दृश्य धडकी भरवणारी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रत्नागिरी येथील मिऱ्या समुद्र किनाऱ्याजवळ अडकलं मोठं जहाज
  • जहाजावर अडकले होते काही खलाशी
  • सर्व खलाश्यांना बाहेर काढण्यात यश

रत्नागिरी: निसर्ग वादळ जसजसं महाराष्ट्राच्या जवळजवळ येऊ लागलं आहे तसतसं याची तीव्रता देखील वाढू लागली आहे. वाऱ्याच्या वेगामुळे कोकणातील समुद्र प्रचंड खवळला आहे. त्यामुळे उंचच उंच लाटा इथे पाहायला मिळायला मिळत आहे. याच दरम्यान, रत्नागिरी येथील मिऱ्या समुद्रात एक भलं मोठं जहाज अजस्त्र लाटांमध्ये अडकल्याचं दिसून आलं होतं. खरं तर हे जहाज भरकटत इथवर आल्याचं समजतं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज सुरुवातीला मिकररवाड बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल झाले आहेत. या जहाजात काही खलाशी देखील अडकले होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून संपूर्ण दृश्य ही धडकी भरवणारी आहेत. दरम्यान, थोड्या वेळाने हे जहाज पंधरा माड परिसरातील संरक्षक भिंतीवर येऊन धडकलं त्यामुळे जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले. अखेर काही वेळानंतर या जहाजावरील खलाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. 

 

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ मुरुड आणि अलिबागदरम्यान धडकण्याची शक्यता आहेत. त्यामुळे या भागातील किनारपट्टीजवळील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वादळ जेव्हा समुद्रकिनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२० एवढा प्रचंड असणार आहे. म्हणजेच हे वादळ पूर्ण क्षमतेने आणि रौद्र रुप धारण करुन जमिनीच्या दिशेने येत आहे. बऱ्याचदा असंही होतं की, चक्रीवादळ हे किनाऱ्याच्या दिशेने येता-येता काहीसं मंदावतं. त्यामुळे वारे वाहण्याचा वेग देखील कमी होतो. निसर्ग चक्रीवादळाबाबत देखील असंच काहीसं होतं का याकडे हवामान तज्ज्ञांचं सतत लक्ष आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार, हे वादळ पूर्ण क्षमतेने किनाऱ्यावर धडकून पुढे सरसावणार आहे. 

दुसरीकडे या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफच्या जवानांनी किनारपट्टी जवळ राहणाऱ्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. याशिवाय येथील अनेक ग्रामीण भागातील तरुणांना संकट काळात कशाप्रकारे मदत करायची याचं देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे या वादळाला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे. 

महाराष्ट्रात १२९ वर्षानंतर घडणार असं काही!

दरम्यान, जसजसं वादळ पुढे सरकत आहे तसतसा वाऱ्याच वेग आणि पावसाचा जोर देखील वाढत आहे. हे वादळ अलिबागच्या जवळपास धडकणार असून पुढे मुंबईहून धुळ्यापर्यंत प्रवास करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या १२९ वर्षात पहिल्यांदाच चक्रीवादळ हे मुंबई आणि महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे वादळ नेमकं किती घातक ठरु शकते हे पुढील काही काळातच समजेल. मात्र, असं असलं तरीही प्रशासन देखील पूर्ण तयारीनिशी या संकटावर मात करण्यासाठी सज्ज झालं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी