RATNGIRI | राज्यसभेचा निकाल लागला आहे, तसाच विधानपरिषदेचा निकाल लागेल - निलेश राणे 

 महा विकास आघाडीची परिस्थिती गंभीर असून आपल्या आमदारांना कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये कोंबावे लागते. तसेच एवढा घाबरलेला मुख्यमंत्री या आधी महाराष्ट्राने पाहिलेला नाही अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

The result of Rajya Sabha has come, so will the result of Legislative Council - Nilesh Rane
राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेचा निकाल लागेल - निलेश राणे  |  फोटो सौजन्य: Times Now

रत्नागिरी :  येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबद्दल बोलताना निलेश निलेश राणे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. राज्यसभेचा निकाल लागला आहे, तसाच विधानपरिषदेचा निकाल लागेल आणि आमचे सगळे उमेदवार निवडून येतील फडणवीस साहेब बोलले की आमच्या मनात शंका नसते, तो रिझल्ट ते म्हणतात तसाच होतो.  महा विकास आघाडीची परिस्थिती गंभीर असून आपल्या आमदारांना कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये कोंबावे लागते. तसेच एवढा घाबरलेला मुख्यमंत्री या आधी महाराष्ट्राने पाहिलेला नाही अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. (The result of Rajya Sabha has come, so will the result of Legislative Council - Nilesh Rane)

भारतीय जनता पक्ष 365 दिवस काम करणारा पक्ष आहे. काही नवीन  मतदार संघ भाजपचा हातून गेले होते ते परत आणण्यासाठी सर्व रणनीती तसेच मोदी लाटेमध्ये सीट निवडून आल्या होत्या. त्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एक सीट आहे अप्रत्यक्ष टोला खासदार विनायक राऊत यांच्यावर लगावला.

पवारांच्या माघारीवर निलेश राणेंचा टोला 

 राष्ट्रपती पदाबद्दल बोलताना पवार साहेबांनी माघार घेतली कारण त्यांचा 100% पराभव होणार हे माहित आहे पवार साहेब पहिल्यांदाच माघार घेत नसून माढातून त्यांना दुरंगी लढाई होती त्या वेळी तिथं विरोध झाला आणि त्यांना कळले की तिथे ते निवडून येणार नाही त्यावेळी ही त्यांनी माघार घेतली होती आणि ते राज्यसभेवर गेले. पराभव दिसतो तेथे माघार घेतात आणि कोणतीही रिस्क ते घेत नाहीत तसेच विरोधकांकडे राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नसून त्यांचा फक्त खो-खो चाललाय विरोधक कितीही एकत्र आले तरीदेखील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार राष्ट्रपती पदावर निवडून येईल.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले राऊत फक्त बोलतात आणि तोंडावर आपटतात तसे ते किती बोलतात काय बोलतात याला मर्यादा नाही. परंतु ते बोलत राहू दे  आणि तो बोलला  म्हणजे आमचा उमेदवार निवडून येणार राज्यसभेच्या वेळीदेखील संजय राऊत बोलले होते आमचे चार उमेदवार निवडून येतील पण काय झाले एक पडला आणि यावेळी पण तेच होणार. आणि संजय राऊत दोष मात्र अपक्षांना देणार.

आमदारांच्या हॉटेल वास्तव याबद्दल बोलताना ते म्हणाले वोटिंग समजवायचं असते एक नंबर चॅटिंग कोणाला दोन नंबर चॅटिंग कोणाला ह्या गोष्टींच्या  चर्चेसाठी भाजप सर्व आमदारांना एकत्र हॉटेलवर नेणार आहे. तसेच आमच्या पक्षाने या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये कधी केले नाही. आम्ही कोणापासून लपून तेव्हा घाबरून बस मधून कोण बस मधे कोंबून  क्रिमिनल सारखे आमदारांना फिरवत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी