Narayan Rane : नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख नाही, कोण अजित पवार? - नारायण राणे

narayan criticized shivsena and ajit pawar नितेश राणे कुठे आहे ते सांगायला मी मूर्ख नाही अशी प्रतिक्रिया त्यांचे वडील  केंद्रीय मंत्री आणि नारायण राणे यांनी दिली आहे. तसेच विधीमंडळाच्या पायर्‍यांवर नितेश राणे यांनी कुठलीही असंसदीय शब्द वापरला नाही असे म्हणून त्यांची पाठराखण केली. अजित पवार कोण त्यांना मी ओळखत नाही असेही राणे यावेळी म्हणाले.

narayan rane
नारायण राणे 
थोडं पण कामाचं
  • सध्या नितेश राणे अज्ञातवासात आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे
  • नितेश राणे कुठे आहे ते सांगायला मी मूर्ख नाही अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
  • नितेश राणेंच्याबाबतीत  कायद्याचा दुरुपयोग होत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे (shivsena)  स्थानिक नेते संतोष परब यांना मारहाणीप्रकरणी भाजप (BJP) नेते नितेश राणे (nitesh rane) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सध्या नितेश राणे अज्ञातवासात आहे की काय अशी शंका उपस्थित होत असताना नितेश राणे कुठे आहे ते सांगायला मी मूर्ख नाही अशी प्रतिक्रिया त्यांचे वडील  केंद्रीय मंत्री आणि नारायण राणे (narayan rane) यांनी दिली आहे. तसेच विधीमंडळाच्या पायर्‍यांवर नितेश राणे यांनी कुठलीही असंसदीय शब्द वापरला नाही असे म्हणून त्यांची पाठराखण केली. अजित पवार (ajit pawar) कोण त्यांना मी ओळखत नाही असेही राणे यावेळी म्हणाले. (union minister narayan criticized shivsena and ajit pawar over nitesh rane arrest)

नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा राणे यांना नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न पत्रकारने विचारला. तेव्हा राणे पत्रकारावर चिडले आणि कुठल्या चॅनलचे पत्रकार आणि असे प्रश्न कसे काय विचारता असा जाब त्यांनी विचारला. तसेच नितेश राणे कुठे आहे हे सांगायला काय मी मूर्ख नाही असेही राणे म्हणाले. ज्यांनी नितेश राणे यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या त्यांना हा प्रश्न विचारा. नितेश राणेंच्याबाबतीत  कायद्याचा दुरुपयोग होत आहे त्यावर पत्रकार काहीच प्रश्न विचारत नाहीत असेही राणे म्हणाले.

कोण अजित पवार

विधीमंडळात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आल्यानंतर नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला होता. त्यावरून अजित पवार यांनी आमदारांना झापले होते. त्यावरून कोण अजित पवार यांना मी ओळखत नाही, अजित पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे अशा माणसाबद्दल का प्रश्न विचारताय असेही राणे म्हणाले.  जेव्हा कोकणावर आपत्ती आली, पूर आला तेव्हा अजित पवार दिसले नाही अशी टीकाही राणे यांनी केली. 

भाजपमध्येही नकलाकार आहेत 

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधीमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली आणि त्यामुळे एकच गदारोळ केला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणीही काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही, ज्यांनी नक्कल केली त्यांना नक्कल करूनच उत्तर देण्यात येईल. नकलाकार काय फक्त त्यांच्याकडेच आहेत का? आमच्या भाजपमध्येही नकलाकार आहेत असेही राणे यावेळी म्हणाले. 

तीन विधानसभा अध्यक्ष करा
 

संसदेच्या धर्तीवर विधीमंडळात आवाजी मतदान पद्धतीने विधासभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. संसदेचे कुठले कुठले नियम आपण विधीमंडळात आणणार आहात असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच  महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही त्यामुळे तिनही पक्षांचा एक एक विधानसभा अध्यक्ष करा असेही राणे म्हणाले. तसेच राज्यपालांनी आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्ष निवडता येणार नाही हे घटनाबाह्य असल्याचे सांगितले हा मुद्दा न्यायाधीन आहे त्यामुळे आपण यावर काही बोलणार नाही असेही राणे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी